बुधवार दिनांक 14 जुलै रोजी भारत पेट्रोलियिम कॉरर्पोरेशन लिमिटेड व पंडित दीनदयाल उपाध्याय डेन्टल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता पखवाडा 2021 सोलापूर एल.पी.जी. प्लांट मध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत प्लांट मधील 250 कर्मचारी वर्गाचे दंत तपासणी करण्यात आले व प्राचार्य राजेंद्र बिरंगणे यांनी दंत आरोग्य व तंबाखूजन्य पदार्थांचा आपल्या शरीरावर होणा-या दुष्परिणामांबद्दल मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमास हॉस्पीटलचे 15 डॉक्टर उपस्थित होते. भारत पेट्रोलियिम कॉरर्पोरेशन लिमिटेड तर्फे दिलीप कुमार रेवेली( क्षेत्रीय प्रबंधक, एल.पी.जी सोलापूर ) व विशाल चव्हाण (सहाय्यक प्रबंधक ,एच.एस.एस.ई) यांनी ही व्यक्तिगत स्वच्छता व कोविड-19 यांच्या सावधगिरी बाळगण्यावर मार्गदर्शन केले.