Saturday, September 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापूर महापालिका निवडणूक 3 सदस्यीय प्रभाग पद्धती?राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत आता बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी हा मोठा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, महापालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन सदस्य प्रभाग असावा अशी भूमिका होती तर शिवसेनेची चार सदस्य असावा अशी मागणी होती. पण अखेर तीन सदस्य प्रभाग पद्धतीला मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. या बैठकीत अजित पवार यांनी दोन सदस्यीय प्रभागांची भूमिका मांडली. तर एकनाथ शिंदे यांनी चार सदस्यीय भूमिका मंडली.

महापालिका निवडणुकांसाठी बहुसदसयीय प्रभाग पध्दतीचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. मात्र, प्रभागात किती सदस्य असतील हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान, मुंबईत एक तर पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूरसह इतर साऱ्या महापालिकांसाठी तीन सदस्यांचा प्रभाग असेल, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका मुदतीत म्हणजे, फेब्रुवारीत होणार असल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे प्रभागरचनेचे कच्चे आराखडे तयार करण्याच्या प्रक्रियेलाही वेग येणार आहे. दरम्यान, प्रभाग पध्दतीवर दोन्ही काँग्रेमध्ये एकमत होत नसल्याने प्रभागात किती सदस्य असावेत, हे ठरलेले नाही.

राज्यातील महापालिकांची मुदत संपलेल्या आणि येत्या फ्रेबवारीपर्यंत (२०२२) मुदत संपणाऱ्या महापालिका, नगरपपरिषद, नगरपालिका, नगरपंचायतींसाठी प्रभागरचनेचा आराखडा करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यादरम्यान, प्रभाग पध्दती बदल करून राजकीयदृष्ट्या सोयीची रचना करण्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले होते. त्यावरून सरकारमधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकाही झाल्या. मात्र, अंतिम निर्णय झाला नव्हता. परंतु, निवडणुकांसाठी चार-साडेचार महिन्यांचा अवधी राहिल्याने प्रभागांचा निर्णय घेणे अपेक्षित होते. भाजप सरकारच्या काळातील चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून मुंबईत नेहमीप्रमाणे एक आणि इतर महापालिकांसाठी सरसकट दोन सदस्यांचा प्रभाग होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावर निर्णय घेत, राज्य सरकारच्या जुन्या कायद्यात बदल करून बहुसदसयीय प्रभागरचनेचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुदतीत निवडणुका होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे वेळेत राज्यात सरकार आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळविण्यासाठी महापालिकांच्या २०१७ निवडणुकांपासून भाजपने चार सदस्यीय प्रभाग केले. त्याचा परिणाम म्हणजे, बहुतांशी महापालिका भाजपच्या ताब्यात आल्या. बहुसदस्यीय प्रभाग भाजपला फायदेशीर असल्याने त्यात बदल करून निवडणुका सहज जिंकता येतील, या हिशेबाने प्रभाग रचना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही होते. त्यामुळे प्रभागरचनांचा आराखडा तयार करण्याचा आदेशही येऊनही सरकारच्या कायद्यात बदल करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ स्वामींनी भरला “बीडीओ”ना दम ; पहा बैठकीत काय घडले

Next Post

काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडची पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकारीणी बरखास्त : तडकाफडकी निर्णय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडची पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकारीणी बरखास्त : तडकाफडकी निर्णय

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000568
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group