Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पदोन्नती व जुनी पेन्शनसाठी काष्ट्राईब संघटना आक्रमक ; राज्यभर आंदोलनाची दिली हाक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 January 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 







सोलापूर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्या आणि जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्या संदर्भात सोलापूरच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय बैठक पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे होते.


प्रामुख्याने दोन्ही मागण्या मान्य न केल्यास काष्ट्राईब महासंघ व इतर समविचारी संघटनेला सोबत घेऊन शासनाच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. बैठकीस महासंघाचे वरीष्ठ उपाध्यक्ष सुमीत भुईगड, विभागीय अध्यक्ष राजाराम इंदवे उपस्थित होते.


राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षणा नुसार पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. महासंघातर्फे कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नती पूर्ण होण्यासाठी शासन आणि न्यायालयीन स्तरावर मागणी आणि पाठपुरावा सुरू आहे. तरीही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच राज्यातील शासकीय व जिल्हा परिषद कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना इतर काही राज्याप्रमाणे लागु करावे, बाह्ययंत्रणे कडून परिचर व वाहन चालक यांचे भरती न होता पूर्वीप्रमाणे बिंदूनामावलीचा अवलंब करून नियमित पद्धतीने शासनाने भरती करावी, राज्यामध्ये अनेक विभागांमध्ये सरळ सेवेची पदे व मागासवर्गीय अनुशेष जागा वर्षानुवर्ष शिल्लक असलेल्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, तसेच सध्या रिक्त जागेच्या 80% पदे भरणे ऐवजी 100% रिक्त पदांची भरती करावी यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्तरावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी  सोलापूर येथे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. 


या बैठकीत राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा विचार करून तात्काळ निर्णय घेऊन प्रलंबीत प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांचा विचार किंवा निर्णय नाही झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काष्ट्राईब महासंघातर्फे पुढील महिन्याच्या फेब्रुवारी 2023 मध्ये शासनाच्या विरोधात एक दिवसाचे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी दिली. यासाठी राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यभर दौरे सुरू केले आहेत.


यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, महासंघाचे कार्याध्यक्ष कल्याण श्रावस्ती, कोषाध्यक्ष एस.ए.लोहार, उपाध्यक्ष विजय माने,  जिल्हा सचिव अरविंद जेटीथोर, सहसचिव महेश लोंढे, संघटक सचिव लक्ष्मण गायकवाड, जिल्हा परिषदे शाखेचे पदाधिकारी भगवान चव्हाण, उमाकांत रजगुरू, नरसिंह  गायकवाड, मकरंद बनसोडे, मोहित वाघमारे, नागनाथ धोत्रे, नागसेन कांबळे, योगेश कटकधोंड, डी.एम.व्हटकर, धनंजय जगताप, दिपक सोनवणे, गणेश शिंदे तसेच महसूल शाखेचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे, पाटबंधारे शाखेचे अध्यक्ष शरण अहिवळे, आरटीओ शाखेचे अध्यक्ष रणदिवे, खांडेकर यांच्यासह कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष राजेश देशपांडे यांनी कार्याध्यक्ष गणेश मडावी यांचा सत्कार केला.

SendShareTweetSend
Previous Post

वेक अप सोलापूर फाउंडेशनने घेतली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची भेट ; या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा

Next Post

शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर झाले जॉईन ; सुलभा वटारे यांचाही ‘वट’ वाढला ; प्रमोशनपूर्वी ‘शिखरे’मात्र अडचणीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर झाले जॉईन ; सुलभा वटारे यांचाही 'वट' वाढला ; प्रमोशनपूर्वी 'शिखरे'मात्र अडचणीत

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979117
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group