Friday, September 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मिळेल तिथे त्यांना संधी द्या : अजयसिंह पवार यांचे प्रतिपादन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रतिनिधी) :- दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये इच्छाशक्ती मोठी असते. मात्र त्यांना वाव देणे गरजेचे आहे. तेव्हा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्यांना मिळेल तिथे संधी द्या, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी केले.

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर अध्यक्षस्थानी होते. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर, दिव्यांग संस्था चालक शशिभूषण यलगुलवार, भीमराव धोत्रे, राजकुमार पाटील, वसंत धोत्रे, चित्रसेन पाथरुट यावेळी उपस्थित होते. 

नेहरू नगर येथील श्री शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या क्रीडा स्पर्धेत अंध, मतिमंद, मुकबधीर, अस्थिव्यंग या प्रवर्गातील एक हजार तीनशे विद्यार्थी सहभागी झाले असून या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेसाठी 350 शिक्षक व कर्मचारी तैनात आहेत. 80 क्रीडा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. हार झाली तर नाराज होऊ नका.असा संदेश देऊन पवार म्हणाले,आज हार झाली तर पुढे जिंकू,ही इच्छाशक्ती ठेवावी. एकीकडे निसर्गाने अन्याय केला असला तरी देखील दुसरीकडे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असते.मात्र त्यांनी संधी उपलब्ध होत नाही,ही खरी खंत आहे.

अध्यक्षीय भाषणात खमितकर म्हणाले, आज सामान्य बुद्धीमत्तेची मुले मोबाईलच्या आहारी गेल्याचे चित्र आहे.मात्र दिव्यांग विद्यार्थी मैदानी खेळ खेळतात, ही कौतुकास्पद बाब आहे. एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत सहभागी करुन यशस्वी नियोजन करणारा सोलापूर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. वेदनेवर मात करुन जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दिव्यांग विद्यार्थी जीवन जगतात,हा त्यांचा आदर्श सामान्य माणसांनी घेण्याची गरज आहे.नजर बदलो, नजारा बदल जाएगा, असा संदेशही त्यांनी दिला.

प्रणव शिंदे, राजा समशेर, पृथ्वीराज शिंदे, शशिकांत पाटील या ‌खेळाडुंनी क्रीडा ज्योत आणली.पांडुरंग भदे या विद्यार्थ्यांने खेळाडूंना शपथ दिली. रोहन भालेराव यांनी विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेत मुकबधीर विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचा वृत्तांत सांगितला.  दत्ता मोकाशी, कमलाकर तिकटे यांनी सूत्रसंचालन केले. 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सच्चिदानंद बांगर, अरुण धोत्रे, राजकुमार पाटील, प्रशांत पवार, कालिदास लोखंडे, कमलाकर तिकटे, रामचंद्र कुलकर्णी, शशिकांत ढेकळे, मोहन थोरात, मच्छिंद्र अंगुले,बहिरप्पा कारभारी, कविता कोळगे, मंजुषा काटकर, शंकर लोणी, रत्नमाला करपे,वनिता वाघमोडे,निता देशपांडे, सुजाता पाटील,प्रमोद कदम, छाया उंब्रजकर, दत्तात्रय तांबे, साहेबगौडा पाटील, शिवानंद कुरमुत्ते, पोपट घोडके, प्रशांत जाधव, सुरेश इटकर, सोमनाथ राऊत,शरद झोंबाडे दामोदर परबत यांनी ‌परिश्रम घेतले. 

बुधवारी (दि.4) छत्रपती शिवाजी रंगभवनमध्ये सकाळी दहा वाजता दिव्यांग ‌विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी दिव्यांग विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रर्र च्या जयघोषात सिद्धेश्वर यात्रेतील 5 नंदीध्वजाचे पूजन ; केंगनाळकर कुटुंबियांची सेवा अर्पण

Next Post

पत्रकार, सामाजिक संस्थांना पुरस्कार, अर्ज करण्यासाठी 7 जानेवारीपर्यंत मुदत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पत्रकार, सामाजिक संस्थांना पुरस्कार, अर्ज करण्यासाठी 7 जानेवारीपर्यंत मुदत

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000951
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group