Saturday, September 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात ; बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम तर गुरुवारी कर्मचाऱ्यांच्या बाॅक्स क्रिकेट स्पर्धा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 January 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या  क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला आजपासून (दि.3) सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.

 दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील अंध, मुकबधीर, मतिमंद, अस्थिव्यंग या प्रवर्गाच्या शाळांमधील एक हजार विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार असल्याचे सांगून खमितकर म्हणाले,”दरवर्षी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय ‌विभागाच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने राज्यस्तरीय दिव्यांग ‌विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.कोरोनामुळे दोन वर्षे या स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे यंदा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आहे.

दिव्यांग विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर म्हणाले, सोलापुरातील नेहरू नगर येथील  शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर ही क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे सांगून   मंगळवारी (दि.3 ) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. पोलिस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन.कोहीनकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजयसिंह पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ईशादीन शेळकंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.दि.3 रोजी दिवसभर क्रीडा स्पर्धा चालणार आहेत.

बुधवार दि.4 रोजी सकाळी ‌दहा वाजता छत्रपती रंगभवन सांस्कृतिक सभागृहात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी ‌अधिकारी  मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी ‌अधिकारी एस.एन.कोहीनकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. 

बुधवारी दुपारी चार वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार असून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल उगले-तेली यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात येतील.जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजयसिंह पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ईशादीन शेळकंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या ‌असून मुख्य नियोजन समितीचे प्रमुख जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील ‌खमितकर हे आहेत.वै.सा.का. सच्चिदानंद बांगर, शशिकांत ढेकळे, अरुण धोत्रे, राजकुमार पाटील समिती सदस्य आहेत.क्रीडा समितीमध्ये प्रशांत पवार, कालिदास लोखंडे, मच्छिंद्र अंगुले, कविता कोळगे हे ‌आहेत. 450 दिव्यांग विद्यार्थी सोलापूरमध्ये निवासी थांबणार असून पोपट घोडके, शिवानंद कुरमुते, सुरेश ईटकर हे निवास समितीमध्ये आहेत. भोजन समितीचे प्रमुख राजकुमार पाटील ‌हे आहेत. तक्रार निवारण समितीचे प्रमुख सच्चिदानंद बांगर हे आहेत. या ‌स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा समाज ‌कल्याण अधिकारी सुनील खमितकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

दिनदर्शिका जीवनात मार्गदर्शक, दिशादर्शक ; सीईओ मनीषा आव्हाळे यांचे प्रतिपादन

Next Post

ब्रेकिंग: 20 हजाराची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्कचा कर्मचारी रंगेहाथ ; अँटी करप्शन ब्युरोची कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग: 20 हजाराची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्कचा कर्मचारी रंगेहाथ ; अँटी करप्शन ब्युरोची कारवाई

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000967
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group