Sunday, May 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप माने : राजकीय वादळापूर्वीची शांतता ; वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 August 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने. सोलापूर जिल्ह्यातील सहकार, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. सहकारांमध्ये तर त्यांचा हात कुणीच पकडू शकत नाही असे अनेक किस्से यापूर्वी पाहायला मिळाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा दूध संघ या सहकारी संस्थांमध्ये त्यांचे कायम वर्चस्व राहिले आहे.

सध्या दिलीप माने हे वादळापूर्वीची राजकीय शांतता असं काहीसं चित्र दिसून येत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून शहर मध्य या मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना अपयश आले तेव्हापासून त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यानंतर वाटत होते ते मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील परंतु ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही  जवळचे मानले जातात. विधान परिषदेसाठी त्यांची चर्चा झाली परंतु राज्यातील समीकरणे बदलली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक झालीच नाही.

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या भागात त्यांची संघटन बांधणी भक्कम आहे. दिलीप माने यांनी पुन्हा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशा मागणीने आता जोर धरला आहे. 

मागील चार वर्षांमध्ये राज्यात अनेक वेळा राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे दिलीप माने हे शांत आहेत.  आपली राजकीय भूमिका ते स्पष्ट करत नाहीत. माने हे नक्की कोणत्या पक्षात असाही प्रश्न उपस्थित केला जातो. दक्षिण सोलापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला. याच मतदारसंघातून दिलीप माने हे 2009 सालामध्ये काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. 2014 साली त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवली त्यातही त्यांना अपयश आले. 2019 मध्ये बदललेली राजकीय समीकरणे आणि परिस्थिती पाहून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार बाबा मिस्त्री यांना मिळालेल्या मतानंतर दिलीप माने यांनी शहर मध्य मतदारसंघात जात आणि काँग्रेस सोडल्याबद्दल चूक केली अशी ही चर्चा ऐकण्यास मिळाली.

आता पुन्हा दिलीप माने यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा होत आहे. यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघावर फोकस करण्यात आलाय. दिलीप माने यांनी पुन्हा काँग्रेस कडून विधानसभा लढवावी अशी ही मागणी समर्थक करीत आहेत.

परंतु मालकांच्या मनात नक्कीच चाललय काय? असाही प्रश्न समर्थकांमधून उपस्थित होतो, लोकसभा निवडणुकीनंतरचे निकाल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणे आणि तयार होणारे वातावरण पाहूनच दिलीप माने हे निर्णय घेतील यात कोणतीही शंका नाही. तोपर्यंत तरी माने म्हणजे राजकीय वादळापूर्वीची शांतता असेच म्हणावे लागेल.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची संवेदनशीलता ; खुर्ची सोडली आणि थेट गेले दिव्यांगाजवळ

Next Post

सोलापूरच्या नेहरू वसतिगृहाची पॉझिटिव्ह बातमी ; जिल्हा परिषद प्रशासन घेणार लवकरात लवकर हा निर्णय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या नेहरू वसतिगृहाची पॉझिटिव्ह बातमी ; जिल्हा परिषद प्रशासन घेणार लवकरात लवकर हा निर्णय

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980982
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group