Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘जय भीम’चे जस्टीस चंद्रु कोण आहेत? ‘सूर्यवंशी’च्या मल्टिस्टारर वर ‘जयभीम’चा एकटा सुर्या भारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 November 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोना लॉकडाऊन उघडल्यावर दीड वर्षानंतर प्रथमच चित्रपटगृह सुरू झाले. बऱ्याच दिवसांपासून दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा चर्चेत असलेला मल्टिस्टारर मुव्ही ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित झाला. त्याच बरोबर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतला सुपरस्टार सूर्या शिवकुमारचा चित्रपट ‘जय भीम’ दिवाळीतच प्रदर्शित झाला. 

विशेष म्हणजे रोहित शेट्टीचा चित्रपट व अभिनेते अक्षय कुमार, अजय देवगन, कटरीना कैफ, रणवीर सिंग यांचा मल्टिस्टारर चित्रपट असल्याने याचाच बोलबाला होता मात्र संवेदनशील आणि सत्य घटनेवर आधारीत ‘जय भिम’ या चित्रपटाने संपूर्ण देशभरात मार्केट मारले. रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’वर सूर्या यांचा ‘जय भीम’ भारी पडला आहे, अभिनेते सूर्या यांच्यानंतर हा चित्रपट ज्यांच्यावर प्रदर्शित करण्यात आला ते जस्टिस के चंद्रु यांच्याबाबत मात्र सध्या एकच चर्चा होत आहे.

या चित्रपटात सूर्याने एका वकिलाची भूमिका साकारली आहे, के. चंद्रू हे त्या वकिलाचे नाव. हा वकिल नेहमीच गरीब आणि आदिवासी लोकांसाठी उभा राहतो. त्यांच्या न्यायासाठी लढा देतो. म्हणजे अगदी खऱ्या अर्थाने हिरो आहे. सूर्याने साकारलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या चित्रपटात सूर्याने साकारलेली वकिलाची भूमिक ज्यांच्या आयुष्यावर बेतली आहे, म्हणजे के. चंद्रू हे खऱ्या आयुष्यात कोण आहेत, त्यांनी कार्य कसे होते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

वकील आणि न्यायाधीशांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि यशोगाथांबद्दल फारसे बोलले जात नाही. कदाचित त्यामुळेच न्यायमूर्ती चंद्रूंबद्दल अजूनही अनेकांना माहिती नव्हती. के. चंद्रू हे फक्त पात्र नाही, ही व्यक्ती खरोखरीच अस्तित्वात आहे. ते मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी अनेक वर्षे वकील म्हणून आदिवासींच्या हक्कांसाठी आवाज उठवला, त्यांना न्याय मिळवून दिला आणि तेही एक पैसाही मोबदला न घेता! आजच्या काळात वकिल म्हणले की त्यांची अव्वाच्या सव्वा फी आठवते, पण के. चंद्रू एकही पैसा न घेता या समाजाच्या हक्कासाठी लढले. कितीतरी लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.



या चित्रपटात चंद्रू यांच्या एका प्रकरणाची कथा घेण्यात आली आहे. १९९३ मध्ये तामिळनाडूमध्ये घडलेल्या एका घटनेवर ही कथा आधारित आहे. न्यायमूर्ती चंद्रू त्यावेळी वकील होते. त्यांनी मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध धैर्याने लढा दिला. इरुलर समाजातील एका आदिवासी महिलेने पोलिसांकडून कोठडीतील छळ आणि पोलिस कोठडीत पतीचा मृत्यू याविरोधात न्यायालयात लढा दिला. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी के. चंद्रू यांनी सर्वतोपरी मदत केली होती. अनेक अवघड प्रसंगांत त्यांनी हार न मानता त्या महिलेला न्याय मिळवून दिला. तामिळनाडूच्या मुदान्नी गावातील कुरवा आदिवासी समाजातील राजकन्नू आणि सेंगाई असे त्या जोडप्याचे नाव आहे. निवृत्त न्यायमूर्ती चंद्रू यांची भूमिका करण्यापूर्वी सूर्या यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांचे काम समाजापुढे आले पाहिजे हे त्यांना जाणवले.


के. चंद्रू यांनी न्यायव्यवस्थेशिवाय स्वतःची वेगळी ओळख ठेवली आहे. वकील असताना आणि आता निवृत्त होऊनही ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. आजपर्यंत चंद्रू यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला आहे. चंद्रू एक वकिल बनले आणि नंतर मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. न्यायाधीश चंद्रू हे भारतातील प्रख्यात न्यायाधीशांपैकी एक आहेत आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. न्यायाधीश म्हणून त्यांनी अनेक ऐतिहासिक निकालांसह सुमारे ९६,००० प्रकरणे निकाली काढली आहेत. दिवसाला ते तब्बल ७५ केस ऐकत असत. काही ऐतिहासिक निर्णयांमध्ये स्मशानभूमीच्या उपलब्धतेबाबत दिलेला निर्णय महत्वाचा ठरला. स्मशानभूमी सर्वांसाठी खुली करावी, मग ती व्यक्ती कोणत्याही जातीच्या असो, त्यात सर्वांना प्रवेश मिळावा असा त्यांनी एका प्रकरणात निकाल दिला होता.

SendShareTweetSend
Previous Post

Soapur | ज्येष्ठ नेते काका साठे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सदस्य एकवटले ; निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

Next Post

सब के संग दिपावली ; जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा अनोखा उपक्रमप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सब के संग दिपावली ; जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा अनोखा उपक्रमप

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979049
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group