Wednesday, September 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गोकुळ परिवाराने जपली उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा ; प्रतीटन २१११ रु दर : बँक खात्यात रक्कम जमा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“भगवान शिंदे यांच्या निधनानंतर गोकुळ परिवार कोलमडला होता या परिवाराने दत्ता शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली धोत्री( दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर्सच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालक पदाची सूत्र हाती येताच दत्ता शिंदे यांनी कारखान्याचा अडचणीत सापडलेला रथ मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने बाहेर काढला सर्व प्रकारची देणी चुकती करून कारखाना सुस्थितीत आणला आहे”.

सोलापूर : अनेक अडचणींचा सामना करीत धोत्री ( तालुका दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाने गतवर्षी गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देऊन आतापर्यंतची उच्चांकी दराची परंपरा कायम राखली आहे .  कारखान्याने प्रति टन 2111 रुपये प्रमाणे ऊस बिलाची रक्कम शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने परिवारासह शेतकऱ्यावर चिंतेचे सावट होते . गतवर्षीच्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या रकमा मिळाल्या नव्हत्या तर ऊस तोडणी यंत्रणा आणि मजुरांची बिले थकली होती. गोकुळ परिवारावर भगवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करण्याचे आव्हान होते . नव्याने कारखान्याची सूत्रे हाती घेतलेले चेअरमन आणि कार्यकारी संचालक दत्ता  शिंदे , एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे यांनी जिद्दीने त्यावर मात केली.

यापुर्वी गोकुळ शुगरने प्रतिटन २६१० रुपये दर दिला होता त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील  अन्य कारखान्यांच्या तुलनेत तो उच्चांकी दर होता. गतवर्षीच्या हंगामासाठी या कारखान्याला २०१८ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आला. मात्र कारखान्याने त्याहीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला. २१११ रुपये प्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे, अशी माहिती चेअरमन दत्ता शिंदे , संस्थापक बलभीम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आगामी गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना बिलाची रक्कम दर दहा दिवसांनी अदा करण्यात येणार आहे. तीन हप्त्यात  रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजब असल्याचेही त्यांनी सांगितले. गळीत हंगामापूर्वीची कामे संपत आली आहेत.यंदाच्या गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे . प्रतिदिन ४,५०० मे टन गाळप क्षमता असून अठरा मेगावॅटचा सहवीजनिर्मिती प्रकल्प आहे .याच गळीत हंगामापासून आसवनी (डिस्टिलरी) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे यांनी सांगितले.

कारखान्याकडे आगामी गळीत हंगामासाठी १०,५०० हेक्टर ऊसाची नोंद करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर,  तुळजापूर,  बार्शी , उस्मानाबाद, मोहोळ आणि अक्कलकोट या सहा तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसाची नोंदणी सुरु आहे. तरी शेतकऱ्यांनी गोकुळ शुगरला ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन दत्ता शिंदे, कारखान्याचे संस्थापक बलभीम शिंदे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे डायरेक्टर विशाल शिंदे आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

शेकापचे जिल्हा चिटणीस भाई सुभाष डुरे- पाटील यांचे निधन

Next Post

शेतीच्या बांधावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शेतकऱ्यांना विचारले हे प्रश्न ; ई- पीक पाहणीनंतर प्रशासनाला सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शेतीच्या बांधावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शेतकऱ्यांना विचारले हे प्रश्न ; ई- पीक पाहणीनंतर प्रशासनाला सूचना

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000256
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group