Friday, June 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काहीही करा दक्षिणला काँग्रेसचे गतवैभव पुन्हा आणा ; दक्षिणच्या निष्ठावंतांची हाक ; हसापुरेंचे बोट पत्रकारांकडे तर धवलसिंह म्हणाले माझं एकच लक्ष…………

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सलग तीन दिवस जिल्ह्यातील 11 तालुक्यांच्या बैठका लावल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक लक्ष लागले होते ते दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बैठकीकडे. बुधवारी काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे, अशपाक बळोरगी, बाबा मिस्त्री, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, अलका राठोड, नलिनी चंदेले, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, बाळासाहेब शेळके, सचिव पंडित सातपुते, बसवराज बगले, कमल कमळे, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, अशोक देवकते, धनेश आचलारे, भीमाशंकर जमादार, मोतीराम चव्हाण, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला या बैठकीमध्ये अनेक युवा कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करताना दक्षिण तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तो तालुक्‍यातील नेत्यांनी एकमेकांचे पाय खेचाखेची केल्याने ढासळला बाबा मिस्त्री सारख्या नवख्या माणसाने बलाढ्य नेत्याला टक्कर दिली त्यामुळे ग्रामीण मध्ये अजूनही काँग्रेसला मानणारा वर्ग आहे. ते तालुक्याचे गतवैभव परत मिळण्यासाठी काही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी आपल्या भाषणात, दीड वर्षापूर्वी मला कार्यकारी अध्यक्षपद मिळाले मात्र या काळात मी पक्षाला न्याय देण्याचे काम केले, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयात कार्यकर्त्यांची कामे केली. सुशीलकुमार शिंदे यांनी सांगेल त्या ठिकाणी बैठका घेतल्या तालुकानिहाय दौरे केले त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी माझे नाव पुढे आले पत्रकारांनी ही माझ्या नावाने वारंवार इच्छुक म्हणून बातम्या प्रसिद्ध केल्या परंतु मी कधीही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक नव्हतो, धवलसिंहांचे नेतृत्व चांगले मिळाले आहे, घराण्याचा वारसा आहे त्यामुळे कुणीही गैरसमज करू नका धवलदादा, सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दक्षिण तालुका काँग्रेसमय करण्याचा विश्वास हसापुरे यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले सुरेश हसापुरे पहा

सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, आता या बैठका नंतर प्रत्येक तालुक्यात बैठका होतील, जिल्हा परिषद गट निहाय दौरे होतील, केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती धरून चालणार नाही तर आता 16 नगरपालिका आहेत, त्यांच्या निवडणुका आहेत, तिथं जावे लागेल, फिरावे लागेल, संघटन वाढवावे लागेल, त्यांचे नियोजन महत्वाचे आहे, गटतट बाजूला ठेवा अशा सूचना म्हेत्रे यांनी केल्या. 

काय म्हणाले सिद्धाराम म्हेत्रे पहा

रामहरी रुपनर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आता जिल्ह्यात मजबूत करायचे आहे, जरा दम धरा, दमबाजी करू नका, अजून लोंढा वाढणार आहे, शांत,संयमी रहावं लागेल, केवळ पदे मिळवण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांची कामं, शासनाच्या विविध योजना माणसांपर्यंत पोहोचवाव्या लागतील, तेव्हा संघटन मजबूत होईल, पक्ष मोठा होईल.

रामहरी रुपनवर यांचे भाषण पहा

शेवटी आपल्या भाषणामध्ये अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले, प्रत्येक कार्यकर्ता मला महत्वाचा आहे, तो स्लिप वाटणारा असेल, बुथवर बसणारा असेल.आजची ओपनची जागा उद्या आरक्षित होईल, त्याठिकाणी तसा कार्यकर्ता तयार ठेवला पाहिजे,  एवढ्याच बैठकांवर मी थांबणार नाही तर  प्रत्येक पंचायत समिती गण,  जिल्हा परिषद गटासह नगरपालिकांची शहरे आणि मोठ्या गावांमध्ये सर्व सेल, विभागांच्या बैठका घेणार आहे. माझे एकच लक्ष आहे पक्ष संघटन मजबूत करणे,माणूस जोडणारा कार्यकर्ता, जनाधार असलेल्या, ऍक्टिव्ह कार्यकर्त्याला संधी देणे.

धवलसिंह मोहिते पाटील यांचे भाषण पहा

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सोलापूर : भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

Next Post

भारती विद्यापीठात इको फ्रेंडली गणेश मुर्तीचे विसर्जन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भारती विद्यापीठात इको फ्रेंडली गणेश मुर्तीचे विसर्जन

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982135
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group