Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अवघे सोलापूर झाले भगवेमय ! आकाशी दुमदुमला श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर होत असलेली शिवजयंती, अतिशय जल्लोषी, उत्साही आणि भक्तिभावाने सोलापूर जिल्ह्यात साजरी करण्यात आली. यंदा शिवजयंतीचा उत्साह काही औरच होता.

शिवजयंतीसाठी आज अवघे सोलापूर शहर सजले होते. शिवभक्त सहकुटुंब मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्वारूढ पुतळ्यास अभिवादनासाठी दिवसभर आणि मध्यरात्री पर्यंत अलोट गर्दी झाली होती. या ठिकाणी शिवप्रेमींनी सहकुटुंब येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. अभूतपूर्व असा उत्साह यावेळी पाहायला मिळाला. येथे मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंडळांचा सत्कार करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता या मिरवणुकीची सांगता झाली.

शहरात रविवारी शिवजयंतीचा उत्साह व जल्लोष विशेष पाहण्यासारखा होता. शिवप्रेमी मोठया संख्येने सहकुटुंब मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. एका मंडळाच्या मिरवणुकीत घोड्यावरील बाल शिवाजींसह मावळ्यांनी  सर्वांचंच लक्ष वेधून घेतले. शिवकालीन मर्दानी खेळांचे चित्तथरारक दर्शन घडले. 

भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता दुतर्फा गर्दीने ओसंडून वाहत होता. जनसागराला जणू भरती आल्याचे विलोभनीय चित्र पाहायला मिळाले. चार हुतात्मा पुतळा चौकात तर रस्त्याच्या एका बाजूला पारंपारिक वाद्यांसह लेझीम पथके तर दुसऱ्या बाजूला डॉल्बीचा दणदणाट त्याचबरोबर लेझर शो, स्क्रीन व विद्युत रोषणाईच्या  प्रकाश झोतात अवघा परिसर झगमगून गेला. डोळ्याचे पारणे फेडणारे मनोहारी दृश्य पाहायला मिळाले.

हिंदू रक्षक मित्र मंडळाच्या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत घोड्यावरील बाल शिवाजींसह मावळ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतले. शिवकालीन संस्कृतीचे दर्शन या मिरवणुकीत घडविले.

शिवजयंतीच्या मिरवणुका आणि मर्दानी खेळांचं एक अतूट नातं आहे. आजच्या भव्य मिरवणुकीत याचे दर्शन घडले. देशमुख पाटील वस्ती येथील हिंदू राष्ट्र रक्षक शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तलवारबाजी, दांडपट्ट्यांची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. बाल शिवाजींसह मावळ्यांचा सजीव देखावा लक्षवेधी ठरला.

धर्मवीर संभाजी तालीम संघाच्या मिरवणुकीत लेझीमचे बहारदार खेळ सादर करण्यात आले. डोक्यावर फेटे, भगव्या टोप्या आणि नऊवारी साडी असा शिवजयंती मिरवणुकीत पारंपरिक थाट होता. या मिरवणुकीत तरुणी व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. हे विशेष ! लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. 

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीत मराठा सेवा संघाने अशी साजरी केली शिवजयंती ; छ्त्रपतींच्या जयघोषाने जिल्हा परिषद दणाणली…!

Next Post

सोलापुरात काळे झेंडे दाखवत अंगणवाडी सेविकांचे थाळी नाद आंदोलन ; या तारखेपासून सेविका बेमुदत संपावर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात काळे झेंडे दाखवत अंगणवाडी सेविकांचे थाळी नाद आंदोलन ; या तारखेपासून सेविका बेमुदत संपावर

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979138
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group