सोलापूर : भारतीय जनता पार्टीने प्रा. लक्ष्मण ढोबळे सरांसारख्या मोठ्या नेत्याला प्रदेश प्रवक्ते पदावर बोळवण केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी लक्ष्मण ढोबळे यांच्या नावाची चर्चा झाली परंतु भाजपने त्यांना पसंती न देता लिंगायत समाजातील धर्मगुरू डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली तरीही सर काय बोलले नाही ते शांत राहिले.
विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्याचा विषय चव्हाट्यावर आला आणि तो दाखला बनावट असल्याचे जात पडताळणी समितीकडून सिद्ध झाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीला उमेदवार नाही अशावेळी लक्ष्मणराव ढोबळे हे उमेदवार निश्चित होऊ शकतात पण त्यांचे नावे पुढे येताना दिसत नाहीत. तसे पाहायला गेले तर प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे हे जेष्ठ राजकीय नेतृत्व, भाजपला त्यांनाही उमेदवारी देता येते परंतु त्यांचे नाव कुठेही निघत नाही आता सरांचे वय झाले आहे त्यामुळे पुनर्वसन म्हणून सरांवर भाजपने प्रदेश प्रवक्ते पदाचे जबाबदारी दिली आहे. सरांचे वक्तृत्व पाहता ते हे पद चांगले सांभाळू शकतात अशी चर्चा आहे.
ढोबळे सरांचे सोलापुरात बरेच दौरे होतात ते आले तर काही पत्रकार त्यांची भेट घेतात. सरांच्या दौऱ्यात त्यांचे स्विय सहाय्यक कुणीतरी पाटील आहेत. त्यांना सरांच्या दौऱ्याचे नियोजन सांभाळता येत नाही. एखाद्या वस्तीगृहाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला सर आपल्या पी ए ची जबाबदारी कशी देतात हाच मोठा प्रश्न आहे. लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापुरात आले तर पत्रकारांचा गराडा त्यांच्याभोवती असतो. सरांच्या तोंडून एखादे वाक्य जरी निघाले तर ती बातमी होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे असे असताना सोलापुरात त्याचे नियोजन होताना दिसत नाही हे एवढ्या मोठ्या नेत्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.