Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील रहीमबाबा अन्सारींचा ६३ वा ऊर्स; दोन दिवस कव्वाली मैफल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 September 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मुस्लीम पाच्छा  पेठेतील प्रसिध्द सुफी संत हजरत पीर अब्दुर्रहीमबाबा अन्सारी यांचा ६३ वा ऊर्स शरीफ महोत्सव येत्या ८ सप्टेंबरपासून चार दिवस साजरा होत आहे. यात पूर्वापार परंपरेनुसार विविध धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऊर्स महोत्सवाचे प्रमुख आकर्षण दोन दिवसीय कव्वाली मैफल होणार  आहे. 

मुस्लीम पाच्छा पेठेत हजरत पीर अब्दुर्रहीमबाबांच्या दर्गाहमध्ये होणाऱ्या या ऊर्स महोत्सवात ८ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता दर्गाहच्या गौसिया मन्झील अरबी मदरशातील मुला-मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा, नात गायन, कुराण पठण आदी कार्यक्रम होतील. दि. ९ रोजी   ‘ संदल ‘चा विधी संपन्न होणार असून तत्पूर्वी रात्री आठ वाजता बाबांच्या समाधीस्थळापासून संदलची शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रा गौसिया मन्झीलमध्ये परतल्यानंतर बाबांच्या पवित्र समाधीला संदल अर्पण केले जाईल. त्यानंतर कव्वालीची मैफल होणार आहे. तत्पूर्वी, सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरही आयोजिले आहे. डॉ. अब्दुल हाफिज जुनैदी (औषधशास्त्र), डॉ. जुवेरिया तन्झीर जुनैदी (स्त्रीरोग), डॉ. शेख खदिजा तबशीर (बालरोग), डॉ. अजिंक्य उकरंडे (प्लास्तिक सर्जरी), डॉ. कांचन उकरंडे (त्वचारोग व सौंदर्य प्रसाधने) हे तज्ज्ञडॉक्टर रूग्णांची वैद्यकीय तपासणी करतील. यावेळी नेत्र तपासणी करून अल्पदरात चष्मे वाटप केले जातील. 

१० सप्टेंबर रोजी ‘ चिरागा ‘ च्या (दीपोत्सव) मुख्य कार्यक्रमातही  कव्वालीची मैफल होणार आहे. दोन्ही मैफलीत दिवंगत प्रख्यात कव्वाल मास्टर हबीब नगरी निझामी यांच्या पट्टशिष्य परंपरेतील असरार नाझा आणि शाहीद अजमेरी (अहमदनगर), अस्लम निझामी (इंदापूर), मुन्ना-मोईन (सोलापूर) यांचा सहभाग राहणार आहे. या ऊर्सच्या पूर्वीपासून म्हणजे बाबांच्या हयातीपासून गौसिया मन्झीलमध्ये कव्वाली मैफलीची परंपरा अखंडपणे चालत आली आहे. तत्पूर्वी, समस्त भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात येईल. याचवेळी शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली निझामी यांचे बौध्दिक प्रवचन होणार आहे. 

११ सप्टेंबर रोजी सकाळी जियारतीच्या धार्मिक विधीने ऊर्सची सांगता होणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यासह नगर, पुणे, हुबळी आदी भागातील बाबांवर असीम श्रध्दा बाळगणारे भाविक या ऊर्स शरीफमध्ये दर्शनासाठी येतात. या ऊर्स शरीफमधील सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व हिंदू-मुस्लीम भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हजरत पीर अब्दुर्रहीम बाबा अन्सारी दर्गाह विश्वस्त समितीचे अध्यक्ष मुदस्सर शरफोद्दीन शेख यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर लोकसभेसाठी हक्काचे उमेदवार सरांना सोलापूरचे नियोजन जमेना ; ‘पीए ची पाटीलगिरी’ सरांना अडचणीत आणणार

Next Post

सोलापुरात भाजपला करावे लागले मग काँग्रेसचा कधी होणार ; आता तर काँग्रेसचे कार्यकर्तेही करू लागले मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात भाजपला करावे लागले मग काँग्रेसचा कधी होणार ; आता तर काँग्रेसचे कार्यकर्तेही करू लागले मागणी

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996696
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group