सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या. पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मनोहर सपाटे यांच्या पुतण्याच्या लग्नाला पावसात हजेरी लावली.
सोलापुरात त्यांनी मुक्काम केला, हॉटेल बालाजी सरोवर याठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला याठिकाणी काँग्रेसचे माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्यामुळे सर्वत्र याची चर्चा सुरू अजून काँग्रेस मधील अनेक मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान चाकोते यांच्या भेटी मागील कारण जाणून घेतले असता, त्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांच्यासोबत जाऊन पवार यांची भेट घेतली. सिद्धाराम चाकोते हे कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत. त्यामूळे ते सोबत गेले होते, जरी ते सोबत गेले असले तरी या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी सिद्धाराम चाकोते यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांचा सत्कार करुन आशीर्वाद घेतलेल्या फोटोने पक्षात खळबळ माजली होती.




















