सोलापूर : राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विशेष करून त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
कामकाजात अनेक त्रुटी आहेत त्याची चौकशी करावी लागेल असे सांगतानाच रजेवर असलेले शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्याही कामकाजाबाबत त्यांनी संताप व्यक्त करत बाबर यांच्या कारभाराची चौकशी होईल असे सांगत एक प्रकारे बाबर यांना त्यांनी इशारा दिला आहे. यामुळे बाबर यांच्या अडचणीत चांगलेच वाढ झाली आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची सायकल बँक तसेच स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमाचे मांढरे यांनी तोंड भरू कौतुक केले. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजीत ढिसले यांच्याबाबतही त्यांनी भाष्य केले. शिक्षण आयुक्त नेमके काय म्हणाले पहा हा व्हिडिओ..