सोलापूर : हिंदू धर्मियांचा पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने वेळेवर पाणीपुरवठा करावा, शहरातील सर्व भागातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, सिद्धेश्वर मंदिराकडे पायी जाणाऱ्या नागरिकांचा विचार करून रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजून घ्यावेत, पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी बंदोबस नेमून काळजी घ्यावी, अशा अनेक महत्त्वाच्या मूलभूत विषयांवर भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्याकडे मूलभूत सुविधा देण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे दरम्यान सुरेश पाटील काय म्हणाले पहा….