महिला सुरक्षा, सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य ; नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घेतला चार्ज
सोलापूर : आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन आज श्री विठ्ठलाच्या सेवेत मी हजर झालो आहे, असे सांगतानाच सोलापूर जिल्ह्यातील महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती नवे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
अतुल कुलकर्णी यांचा सोलापुरातील सर्वच पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी सत्कार करून स्वागत केले.
सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी कामाचा अनुभव असल्याने महिलांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दिसतोय त्याकडे सर्वाधिक लक्ष राहणार आहे. सायबर क्राईम रोखणे गरजेचे असून त्यावर ही फोकस राहील, पारधी समाजातील गुन्ह्याचे प्रमाण कमी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.