Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी घेतला ‘हुग्गी अन् धपाट्यांचा आस्वाद’ ; म्हणाले, “रानभाज्यांची चवच न्यारी”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 August 2024
in krushinews
0
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी घेतला ‘हुग्गी अन् धपाट्यांचा आस्वाद’ ; म्हणाले, “रानभाज्यांची चवच न्यारी”
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी घेतला ‘हुग्गी अन् धपाट्यांचा आस्वाद’ ; म्हणाले, “रानभाज्यांची चवच न्यारी”

सोलापूर दि. 31(जिमाका):- सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी रानभाज्या व तृणधान्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या दैनंदिन आहारात रानभाज्या व तृणधान्याला अधिक महत्त्व द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये आयोजित रानभाजी व मिलेट महोत्सव उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी पुणे येथील आत्माचे संचालक अशोक किरनळी, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्मा प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपसंचालक शितल चव्हाण, पर्यवेक्षक अनिता शेळके, नीलिमा हरसंगमा, मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे दिनेश क्षिरसागर यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, रानभाज्या मध्ये औषधी गुण आहेत, त्यामुळे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. प्रत्येक रानभाजीचे एक गुणधर्म आहे. तसेच तृण्य धान्य ही आरोग्यास पोषक आहेत. जागतिक पटलावर ही तृणधान्य चे महत्व आधोरेखित झाले आहे. त्यामुळे हा महोत्सव रानभाजी व मिलेटचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या महोत्सवाच्या माध्यमातून रान भाजी व मिलेटचे महत्व लक्षात घेऊन आपल्या रोजच्या आहारात बदल करावा. व आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते फीत कापून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन रानभाज्यांचे महत्त्व आपल्या आरोग्यामध्ये किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेतले. तसेच (मिलेट) तृणधान्यापासून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देऊन काही पदार्थांचा आस्वादही घेतला. तसेच रान भाज्या तसेच तृण धान्य उत्पादन घेणाऱ्या शेतकरी व महिला बचत गटांचे विशेष कौतुक त्यांनी केले.
तसेच यावेळी कृषी विभागाच्या पुस्तिकेचे ही प्रकाशन झाले.

*उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान:-

प्रत्येक तालुक्यातील एक शेतकऱ्यांचा येथे सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रणव बिराजदार निंबर्गी, विलास टेकाळे पापरी (मोहोळ), वासुदेव गायकवाड चळेगाव, सत्यवान लेंगरे आंधळगाव ( अपंग शेतकरी ), राहुल काळे नातेपुते, महेंद्र देशमुख कुंभारगाव. तसेच तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थ महिलाबचत गटांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यामध्ये विद्या मेहता, अनुराधा बनसोडे, रेखा हजारे, सुरेखा होटगीकर, बबीता जाधव, वंदना अवताडे या महिलांचा प्रशिस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तर या खाद्यपदार्थांचे पर्यवेक्षण करण्याचे काम नीलिमा हरसंगमा, अनिता शेळके, दिनेश क्षीरसागर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.

या महोत्सवास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महोत्सवास उपस्थित मान्यवरांचे तसेच उपस्थित शेतकऱ्यांचे आभार प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी मानले.
********

Tags: Collector kumar ashirwadSolapurरानभाजी महोत्सव
SendShareTweetSend
Previous Post

‘शहर मध्य’ मिळण्यासाठी मास्तर आग्रही ; काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरातांच्या बैठकीत काय घडले

Next Post

दक्षिणमध्ये झाला या पाटलांचा उदय ; बापूंना टेन्शन की बोलावता धनी वेगळाच ? अयो ! पाचशे गाड्या घेऊन जाणार म्हणे..

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998228
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group