सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक सरपंचांनी तेलंगणाच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश दक्षिण सोलापूर तालुक्यातील सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षाला डोकेदुखी ठरणारा आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी हौशे गैशे म्हणत हे सर्व हैद्राबाद फिरायला गेल्याचे सांगत त्यांची खिल्ली उडविली.
यावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबा मिस्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सरपंच जाणे हे सर्वांसाठीच चिंताजनक आहे. परंतु, दक्षिण सोलापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, जरी दोन टर्म तालुका भाजपच्या ताब्यात गेला असला तरी या निवडणुकीवेळी मात्र काँग्रेस पुन्हा आपल्या ताब्यात घेईल असा विश्वास व्यक्त करीत बीआरएस मध्ये गेलेल्यांची आम्ही मने वळवू, ते निवडणुकीत काँग्रेसचे काम करतील असा विश्वास व्यक्त केला. पहा बाबा मिस्त्री काय म्हणाले…