मुबंई- सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व विविध ज्वलंत समस्यांबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर लेखी निवेदन देताना कॉ. आडम मास्तर यांनी इत्यंभूत माहिती दिले व त्यावेळेस मुख्यमंत्री यांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाबाबतची सर्व माहिती घेऊन अहवाल सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभागाचे अधिकारी गोविंद राज (तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी) यांना तात्काळ चौकशी करून लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे परिवहन कामगारांना त्यांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा कॉ. आडम मास्तर यांनी व्यक्त केली.
२१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मधील गिरणी कामगारांना शासनाच्या वतीने घरे मिळवून देण्याकरिता येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्याकरिता संबंधित मा.खासदार, आमदार व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. त्याप्रमाणे सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत बैठक चालली. या चर्चेमध्ये मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातील कामगारांना घरे कधी देणार ? अशी विचारणा कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केली असता मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याबाबत सूचना दिले.
यावेळी या शिष्टमंडळामध्ये परिवहन कर्मचारी कॉ.तौफिक शेख, सेवा निवृत्त कर्मचारी कॉ. सुरेश बागलकोटे, सिटूचे राज्य सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) हे उपस्थित होते.