सीईओ मनीषा आव्हाळे यांनी विभाग प्रमुखांकडून मागवल्या तात्काळ या याद्या ; लोकसभा आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी
सोलापूर : 16 मार्च रोजी अठराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. लोकसभेच्या निवडणुका लागल्याने प्रशासन सतर्क झाले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ सर्व प्रशासनाची बैठक घेऊन आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी रविवारी तात्काळ जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांना पत्र काढले. या पत्रामध्ये त्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द झालेली असून सदर घोषणेपासून म्हणजेच दि.१६/०३/२०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांनी आदर्श आचारसंहिते अंमलबजावणी करणेबाबत खालील प्रमाणे माहिती आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मागविलेली आहे.
१. आपल्या विभागामार्फत दिनांक १६/०३/२०२४ पर्यंत किती व कोणत्या प्रशासकीय मान्यता आदेश निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत याची यादी व प्रशासकीय मान्यतेच्या झेरॉक्स प्रती देण्यात यावी.
२. आपल्या विभागामार्फत दिनांक १६/०३/२०२४ पर्यंत किती व कोणत्या कार्यारंभ मंजूरी आदेश निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी किती कामे सुरु आहे व किती कामे अद्याप सुरु नाहीत याची यादी देण्यात यावी.
३. आपल्या कार्यालयातील आवक व जावक रजिस्टर, संबंधित कार्यासनाचे कार्यविवरण नोंदवही जमा करावे.
उपरोक्त मुद्यांची माहिती ईमेलदवरे अथवा प्रत्यक्षात आज दिनांक १७/०३/२०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सादर करण्यात यावी अथवा सदर माहिती देण्यास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी.