Friday, June 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भारती विद्यापीठांमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 March 2025
in solapur
0
भारती विद्यापीठांमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारती विद्यापीठांमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर व राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2025 रोजी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून व्ही.एम. मेडिकल कॉलेजच्या विभाग प्रमुख डॉ. स्मिता चाकोते व प्रसिद्ध अर्थतज्ञ सीए निलाशा नोगजा लाभल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्या डॉ. स्मिता चाकोते यांचा सत्कार इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांच्या हस्ते तर दुसऱ्या प्रमुख पाहुण्या सी.ए. निलाशा नोगजा यांचा सत्कार राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

आपल्या स्वागत पर भाषणामध्ये संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी इन्स्टिट्यूट तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिलीच तसेच भारती विद्यापीठाचा चढता आलेख सांगितला. कार्यक्रमाची प्रस्तावना उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केली व कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू विशद केला. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.शबनम माने व प्रा. स्मिता गंभीरे यांनी करून दिली.

यावेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून समाजाच्या विकासासाठी ज्यांनी भरीव योगदान दिले अशा तीन महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शिक्षणतज्ञ कै. ग.सा. पवार यांच्या पत्नी श्रीमती विमल पवार यांचा समाज कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीमती शामाबी नदाफ यांचा लघु उद्योगातील भरीव कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला व भारती विद्यापीठाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी गवळी हिने एम. एस. डब्ल्यू. परीक्षेमध्ये विद्यापीठात गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.

सत्काराच्या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्या डॉ. स्मिता चाकोते व सी.ए. निलाशा नोगाजा यांच्या महिला व आरोग्य तसेच महिला व आर्थिक नियोजन या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये उपस्थित महिला वर्ग व विद्यार्थिनी यांनी प्रमुख पाहुण्यांना विविध प्रश्न विचारले व प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये जर कुटुंबाचे आरोग्य चांगले राखायचे असल्यास महिलांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ. स्मिता चाकोते यांनी सांगितले. तर कुटुंबाच्या आर्थिक नियोजन मध्ये पुरुषांबरोबर महिलांनीही सहभागी होणे गरजेचे असल्याचे सी.ए. निलाशा नोगाजा मॅडम यांनी सांगितले. घरातील महिला ही एक उत्तम व्यवस्थापक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बरबडे व अनिशा गवेकर यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. शिवगंगा मैंदर्गी यांनी काम पाहिले आभार प्रदर्शन सौ. प्रांजली मोहीकर यांनी केले. यावेळी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थिनी महिला कर्मचारी तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: Bharati Vidyapeeth solapurWomen's day
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील या ताई महिला दिनी पुरस्काराने भारावल्या ! सीईओ साहेबांनी असे केले कौतुक

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचारी युनियनचे काळया फिती लावून कामकाज अन् घंटानाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचारी युनियनचे काळया फिती लावून कामकाज अन् घंटानाद

सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचारी युनियनचे काळया फिती लावून कामकाज अन् घंटानाद

ताज्या बातम्या

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981949
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group