आम्ही पक्षात का थांबावं ; जयंत पाटलांच्या दौऱ्या दिवशीच सोलापुरात या निष्ठावंताचा पक्ष सोडण्याचा इशारा
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बांधणी आणि विधानसभेला इच्छुक याची माहिती जाणून घेण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत.
सोलापुरातील अकरा विधानसभा मतदारसंघात शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष समोर आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे. एकीकडे जयंत पाटलांचा संवाद मेळावा होत असतानाच दुसरीकडे मात्र जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. तो पदाधिकारी म्हणजे जिल्हा सरचिटणीस महेश माने.
मागील वर्ष दीड वर्षापासून पक्ष अडचणीत असताना आम्ही सोबत राहिलो, कामे केली, सांगेल ते आदेश पाळले, त्यामुळे महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले असे असताना आम्हाला मोठ्या पदाची अपेक्षा असणे गैर आहे का? कालपरवा आलेल्यांना, ज्यांना पक्षाचा कोणता गंध नाही अशांना जर मोठी पद दिली जात असतील तर आम्ही पक्षात थांबायचे का? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांनी लक्ष घालावे अन्यथा आम्हाला पक्ष सोडावा लागेल असा इशारा माने यांनी दिला आहे. पहा ते नक्की काय म्हणाले हा व्हिडिओ..