महेश कोठे अजित पवार गटात येणार ; उमेश पाटलांचे सूतोवाच ; भारत जाधवांना वयाचे निकष काका साठे यांना का नाहीत
सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांचा अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही. त्यांना सांगण्यावरून जरी काही कार्यकर्ते आमच्या राष्ट्रवादीत आले असले तरी भविष्यात कोठे हे आमच्याकडेच येतील असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शहराच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांना वयाचा निकष लावून राजीनामा देण्यास भाग पाडले यावर प्रतिक्रिया विचारले असता भारत जाधव यांना वयाचे निकष लावण्यात आले आहेत उलट भारत जाधव हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या पेक्षा कमी वयाने लहान आहेत. हेच निकष काका साठे यांना का नाहीत असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.