सोलापुरात पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण धारित खोके काढण्यास सुरुवात
सोलापूर जिल्हा परिषदेत समोरील अनेक वर्षापासूनचे अतिक्रमण करण्यात आलेले खोके महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात काढण्यास सुरुवात केली आहे.
सदर बजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी बनसोडे हे सकाळी दहा वाजल्यापासूनच जिल्हा परिषदेच्या समोर पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये येऊन थांबले होते यावेळी अतिक्रमणधारकांनी प्रचंड विरोध केला.
त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बेळेनवरू यांनी पोलिस आणि महापालिकेला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे हे या ठिकाणी आले. त्यांनीही पोलिस आणि महापालिकेला चर्चा केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या तक्रारीवरून आम्ही अतिक्रमण काढत आहोत असे सांगण्यात आले. तेव्हा चेतन नरोटे हे सीईओ आवळे यांना भेटण्यास गेले असता त्या कार्यालयात नव्हत्या. नंतर चेतन नरोटे हे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले त्यानंतर पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे आल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या त्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई जोरात सुरू झाली.






