Tuesday, March 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘द बर्निंग टेक्सटाइल’ : खासदार प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक ; मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 May 2025
in solapur
0
‘द बर्निंग टेक्सटाइल’ : खासदार प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक ; मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी
0
SHARES
461
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘द बर्निंग टेक्सटाइल’ : खासदार प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक ; मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

सोलापूर : सोलापुरात रविवारची पहाट अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटनेने उजाडली. अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील एका टेक्स्टाईल ला भीषण आग लागून त्या दुर्घटनेने तब्बल आठ जणांचा बळी घेतला. त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहर हळहळले. या गंभीर घटनेनंतर त्या भागामध्ये सुरक्षेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान याप्रकरणी खासदार प्रणिती शिंदे या आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली की, सोलापूर येथील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांना वारंवार शॉक सर्किटमुळे लागणारी आग व त्यामुळे होणारे प्रचंड प्रमाणातले नुकसान याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने लक्ष का देत नाही या भागात औद्योगिक वसाहत व नागरी वसाहतींना एकाच वीज उपकेंद्रामधून वीज पुरवठा केला जातो. विजेचा दाब कमी अधिक झाल्यानंतर शॉक सर्किट होवून कारखान्यांमध्ये आग लागण्याचे प्रकार या अगोदरही बऱ्याच वेळा झालेले आहेत. परंतु त्यामध्ये आतापर्यंत जीवित हानी झाली नव्हती. आज घडलेल्या घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झालेली आहे आता तरी शासनाचे व प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत की नाहीत. आज घडलेल्या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चार जण व चार कामगार अशा आठ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या भागात आम्ही महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून तात्पुरत्या स्वरूपाची अग्निशामक दलाची गाडी उभा करण्याची सोय केली होती जेणेकरून आग लागण्याची घटना घडल्यावर पहिली गाडी तत्काळ पोहोचू शकेल. तरी परंतु हि प्राथमिक सोय उपलब्ध असताना देखील आगीने ऐवढे रौद्रय रुप कसे काय धारण केले याची चिंता वाटते.

आम्ही वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांबद्दल विधानसभेत आवाज उठवलेला आहे. तरीही शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही तसेच मनपा प्रशासनाने ही याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये वारंवार लागलेल्या आगीच्या घटनांचे लक्ष वेधून डी.पी.डी.सी 2023-24 च्या निधीमधून या भागामध्ये अग्निशामक केंद्र उभारण्याकरिता 1 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर करून घेतला व महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. तरी अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन केंद्राचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाचे या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास येत आहे.

विजेचा दाब कमी जास्त होऊन शॉक सर्किट होते व त्यामुळे कारखान्यांमध्ये आग लागते असा प्रकार काही वर्षापासून अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमध्ये होत असल्याने आम्ही महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी सोबत कारखनदारांची बैठक घेतली होती त्यामध्ये प्रकर्षाने या भागाचा विद्युत सोयी-सुविधांचा डीपीआर तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे परंतु शासनाच्या ऊर्जा विभागाकडून याला मंजुरी मिळालेली नाही असे समोर आल्यानंतर आम्ही ऊर्जा खात्याच्या सचिवांशी संपर्क साधला परंतु या भागातील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या डी पी आर ला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या डीपीआर ला तात्काळ मंजूर देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली आहे त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचण्याकरीता अडथळे निर्माण होतात व वेळेत गाडी न पोहोचल्यामुळे आग मोठ्याप्रमाणात पसरू लागते. मला मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीमधून रस्ते करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याची कामे मोठ्याप्रमाणावर असल्यामुळे शासनाच्या उद्योग किंवा नगरविकास विभागाकडून येथील पायाभूत सोयी-सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष निधी द्रयावा व ऊजा विभागाने या औद्योगिक वसाहतीचा विद्युत सोय-सुविधांचा डि.पी.आर. मंजूर करून त्यास तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा.

Tags: @PranitiShindeBurning textileCM Devendra FadnvisPraniti Shinde
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात ‘समांतर’ वरून भाजपच्याच दोन आमदारांमध्ये ‘ मत-मतांतर ‘

Next Post

तुळजापुरात व्यक्तिमत्व विकास शिबिर ; युवा पिढीसाठी काय आहे हा उपक्रम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
तुळजापुरात व्यक्तिमत्व विकास शिबिर ; युवा पिढीसाठी काय आहे हा उपक्रम

तुळजापुरात व्यक्तिमत्व विकास शिबिर ; युवा पिढीसाठी काय आहे हा उपक्रम

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973461
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group