





स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त समर्थ नगरात भक्तांना कार्यक्रमांची मेजवानी
सोलापूर : जुळे सोलापुरातील समर्थ नगरात जागृत श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. वैशाली शहापुरे चंद्रकांत शहापुरे आणि युवराज राठोड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गुरुवारी स्वामी समर्थ मंदिरात हरी भक्त पारायण कार नागनाथ पाटील व त्यांच्या सहकार्याचे हरि पारायण या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. झेडपी अभियंता राम जेऊरे, भीमराव राठोड, प्रकाश कटारे, दयानंद भिमदे, वैशाली शहापुरे, माधुरी डहाळे, अनिल हिबारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शुक्रवार 28 मार्च रोजी डॉक्टर भीमाशंकर बिराजदार यांचे महात्मा बसवेश्वर व ज्ञानेश्वरी या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार 29 मार्च रोजी दीपक कलढोणे यांची भक्ती संगीत सेवा हा कार्यक्रम होणार आहे.
31 मार्च रविवारी सकाळी आठ ते नऊ कलश मिरवणूक, सकाळी नऊ ते बारा होम हवन, दुपारी बारा वाजता आरती व पाळणा, दुपारी चार ते आठ भजन, रात्री आठ नंतर लक्ष दीपोत्सव व आरती हे कार्यक्रम होणार असून दररोज भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.