सोलापूर झेडपी सीईओ मनिषा आव्हाळे यांचे पत्र निघाले ; अधिकारी कर्मचारी करणार आता फुल्ल एन्जॉय
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन येत्या 24 ते 26 फेब्रुवारी या तीन दिवसात होणार असून त्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तसे पत्र काढले आहे.
क्रीडा स्पर्धा या विजापूर रोडवरील नेहरूनगर जय जवान जय किसान प्रशालेच्या क्रीडांगणावर तसेच इनडोअर स्पर्धा या ऑफिसर क्लब या ठिकाणी होणार आहेत. आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये होतील.