Wednesday, September 3, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील या खून खटल्यात 365 पानी दोषारोपपत्र दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 April 2025
in crime
0
सोलापुरातील या खून खटल्यात 365 पानी दोषारोपपत्र दाखल
0
SHARES
474
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील या खून खटल्यात 365 पानी दोषारोपपत्र दाखल

सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पिडीत महिला, रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी
1.प्रमोद रामचंद्र गायकवाड,
2.प्रसेनजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड,
3.हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड,
4.किरण उर्फ मनोज दिलीप अंकुश,
5.श्रीजीत उर्फ सनी विलास निकंबे
6.समरसेनजित उर्फ टिपु प्रमोद गायकवाड
7.संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड,
8.योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले
9.अजित ईश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

 

याप्रकरणी तपास पूर्ण होऊन सदर बझार पोलिसांनी मुख्यन्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले असून दोषारोपपत्र 365 पानी आहे.

यात हकिकत अशी कि, दि.१/१/२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील रिंकि शिवशरण, अदित्य दावणे, पुथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबलेले होते. त्यावेळी सनी निकंबे हा दारु पिऊन पिडीत महिलेच्या अंगावर आला, प्रमोद गायकवाड पट्टा काढून अदित्य दावणे यास मारहाण करू लागला. त्यावेळी ऋतूज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड याने प्रसेनजीत उर्फ लकी, हर्षजीत उर्फ विकी व संजय उर्फ सोन्या या तिघांना आवाज देऊन “गाडीतील रॉड काढून घेऊन या, या लोकांना माज आलेला आहे, कुठले भिकारडे येथे आलेले आहेत”, असे ओरडून शिविगाळी करून त्यांना बोलावून घेतले. सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पिडीत महिला, रितेश गायकवाड, सुमित गायकवाड यांना मारहाण केली, त्यावेळी कोण जर यांच्या मदतीला आले तर त्यांना देखील आम्ही सोडणार नाही असे ओरडल्याने कोणी मदतीला आले नाही.

परंतु निलेश शिरसे व सागर शिरसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सर्व आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली. त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असता समरसेनजीत उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले व रस्त्यावरून फारशी उचलून वैभव वाघे च्या डोक्यात घातली. त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुकाचे सहाय्याने त्याचे सर्वांगावर मारहाण केली.

प्रमोद गायकवाड याने लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड, व डोक्यात मारले, प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रोडने त्याचे हातापायावर, डोक्यावर, पाठीवर, व शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली. अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली. प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडविण्यास कोणीही पुढे आले नाही. वैभव वाघे हा मोठमोठ्याने रडत होता परंतु सर्व आरोपी त्यास अमानुषपणे मारहाण करीत राहिले. तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले. वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर दि. ०६/०१/२०२५ रोजी तो मरण पावला. अशी फिर्याद आशा वाघे यांनी सदर बझार पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली होती.

यात मुळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष वि. न्हावकर, अँड वैष्णवी न्हावकर, अॅड. राहुल रुपनर, अॅड. शैलेश पोटफोडे,अँड.मीरा पाटील,अँड चैतन्य नल्ला तर आरोपीतर्फे अँड. शशी कुलकर्णी,प्रशांत नवगीरे, अँड राज पाटील हे काम पाहत आहेत.

Tags: CrimePramod gaikwadSolapur district courtVaibhav vaghe murder case
SendShareTweetSend
Previous Post

दिलीप मानेंच्या निवासस्थानी पालकमंत्र्यांनी चाखली टेस्टी आमरसाची चव ; या नेत्यांच्या उपस्थितीने वाढला गोडवा

Next Post

महिला तलाठी व महसूल सहाय्यक सतरा हजाराची लाच घेताना सापडले ; याठिकाणी झाली कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्याला वीस हजाराचे लाच घेताना अँटी करप्शनने पकडले

महिला तलाठी व महसूल सहाय्यक सतरा हजाराची लाच घेताना सापडले ; याठिकाणी झाली कारवाई

ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांचे ‘दिलखूष’ झाले ; सुरेश पाटलांनी असे काय केले !

पालकमंत्र्यांचे ‘दिलखूष’ झाले ; सुरेश पाटलांनी असे काय केले !

3 September 2025
सोलापूर महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर ; पहा कोणत्या प्रभागात कोणत्या नगरा

सोलापूर महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर ; पहा कोणत्या प्रभागात कोणत्या नगरा

3 September 2025
राजकीय गणेशोत्सव ! पालकमंत्री गेले दिलीप मालकांकडे अन् सुभाष बापूंनी बोलावले चंद्रकांतदादांना

राजकीय गणेशोत्सव ! पालकमंत्री गेले दिलीप मालकांकडे अन् सुभाष बापूंनी बोलावले चंद्रकांतदादांना

2 September 2025
सोलापुरातील एकाच कुटुंबातील सलग तीन दिवसात चौघांचा मृत्यू ; ती रात्र आली काळ बनून

सोलापुरातील एकाच कुटुंबातील सलग तीन दिवसात चौघांचा मृत्यू ; ती रात्र आली काळ बनून

2 September 2025
धक्कादायक : कॅमेरामन दत्तराज कांबळे यांचे निधन

धक्कादायक : कॅमेरामन दत्तराज कांबळे यांचे निधन

2 September 2025
सोलापूरला दिल्ली दरबारी कायदेशीर मदतीची ग्वाही ; खा. उज्वल निकम यांचा केतन वोरा मित्र परिवाराने केला सत्कार

सोलापूरला दिल्ली दरबारी कायदेशीर मदतीची ग्वाही ; खा. उज्वल निकम यांचा केतन वोरा मित्र परिवाराने केला सत्कार

1 September 2025
सोलापूरला दिल्ली दरबारी कायदेशीर मदतीची ग्वाही ; खा. उज्वल निकम यांचा केतन वोरा मित्र परिवाराने केला सत्कार

सोलापूरला दिल्ली दरबारी कायदेशीर मदतीची ग्वाही ; खा. उज्वल निकम यांचा केतन वोरा मित्र परिवाराने केला सत्कार

1 September 2025
सोलापूर जिल्ह्यात नो-डॉल्बी, नो-लेझर लाईट ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

सोलापूर जिल्ह्यात नो-डॉल्बी, नो-लेझर लाईट ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

30 August 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापुरात जीएसटी नंबर साठी पाच हजाराची लाच घेतली ; दोन अधिकाऱ्यांना बेड्या

by प्रशांत कटारे
22 August 2025
0

सोलापुरात जीएसटी नंबर साठी पाच हजाराची लाच घेतली ; दोन अधिकाऱ्यांना बेड्या सोलापूर : ठेकेदाराला जीएसटी नंबर देण्यासाठी पाच हजाराची...

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

by प्रशांत कटारे
8 August 2025
0

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर...

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

by प्रशांत कटारे
6 August 2025
0

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशय जनावरांच्या कत्तली करणाऱ्या माजी नगरसेवक...

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

by प्रशांत कटारे
5 August 2025
0

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

Our Visitor

1860754
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group