Monday, April 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा टॉपचे गुन्हेगार दत्तक ; गुन्हेगारांच्या आयुष्यात उजाडली नवी ‘पहाट ‘

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 January 2025
in crime
0
सोलापुरात पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा टॉपचे गुन्हेगार दत्तक ; गुन्हेगारांच्या आयुष्यात उजाडली नवी ‘पहाट ‘
0
SHARES
724
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा टॉपचे गुन्हेगार दत्तक ; गुन्हेगारांच्या आयुष्यात उजाडली नवी ‘पहाट ‘

सोलापूर : वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना ‘पहाट’ या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगार दत्तक योजना सुरू केली आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः दहा गुन्हेगारांना दत्तक घेतले असून त्यांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गुन्हेगारी समजातील लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पहाट ” उपक्रमांची पाळेमुळे सोलापूर जिल्ह्यात घट्ट होत आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या उपक्रमामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे ह‌द्दीतील गुन्हेगार समाजास बाहेर काढण्यासाठी विडा उचलला आहे.

पोलीस ठाणे हद्दीतील वारंवार गुन्हे करणारे लोकांची यादी तयार केली असून त्यांना व त्यांच्या कुटूंबांना आवश्यक असणारे रहीवासी दाखला, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदान कार्ड व आधार कार्ड अशी मुलभूत कागदपत्रे काढून देण्यास मदत केली आहे.

जन्म दाखला ३२९, जातीचा दाखला १८५, अपंग प्रमाणपत्र ०८, घर बांधणी प्रस्ताव ०४,
आधार कार्ड २३५, वाहन लायसन्स ०६, शेती प्रशिक्षण १२ वस्ती, खाजगी नोकरी ३६ पोलीस प्रशासनाने या गुन्हेगार कुटुंबीयांना दिले आहे.

पोलीस व गुन्हेगारी समाजातील लोकांचे संबंध सुधारले आहेत. परंतू गुन्हे करण्याची सवय असलेले व गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात घेवून येण्यासाठी त्यांच्याशी पोलीसांचा नियमीत संपर्क येण्यासाठी सदर गुन्हेगारांना दत्तक घेण्याबाबत सूचित केले. तसेच त्याची अंमलबजावणी स्वतः पासून सुरू केली आहे. जिल्ह्यातील टॉप चे १० गुन्हेगार स्वतः दत्तक घेतले आहेत. तसेच अपर पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक स्था. गु.शा. यांना प्रत्येकी १० गुन्हेगार दत्तक दिले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी यांना प्रत्येकी ०५ गुन्हेगार व पोलीस अंमलदार यांना प्रत्येकी ०२ गुन्हेगार दत्तक दिले आहेत. यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार हे दत्तक आरोपीच्या नियमीत संपर्कात राहून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यास मदत करत आहेत.

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी दत्तक घेतलेल्या गुन्हेगारांशी स्वतः संवाद साधला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, उदरनिर्वाहाची साधने याबाबत स्वतः माहिती घेतली. तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाचे व एकात्मिक आदिवासी विकास महामंडळाचे योजनाची माहिती देवून त्यासाठी आवश्यक कागद पत्रासह प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.

शुक्रवारी पोलीस मुख्यालयात यासाठी उपस्थित गुन्हेगार समाजातील लोकांना श्रीमती शैलजा क्यातम, सहायक पोलीस अभियोक्ता, रामराजे देशमुख, विधी अधिकारी व सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक यांनी गुन्हेगार हे कायद्याच्या कचट्यात सापडल्यानंतर कसे त्यात गुंतत जातात याची उदारणे देवून माहिती दिली. तसेच त्यांची ही गुन्हेगारी कृत्ये समाजात अशांतता निर्माण करतात यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सुध्दा करावी लागते. अशी माहिती दिली.

सरतापे, सहाय्यक संचालक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांनी देखील गुन्हेगारीतून बाहेर पडू इच्छीतांना शासनाकडील योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे स्पष्ट केले.

Tags: PahatSolapur rural policeSp Atul Kulkarniपारधी समाज
SendShareTweetSend
Previous Post

डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के, शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला

Next Post

ब्रेकिंग : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूरचे पालकमंत्री

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
ब्रेकिंग : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूरचे पालकमंत्री

ब्रेकिंग : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूरचे पालकमंत्री

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1977427
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group