सोलापूर महापालिकेच्या बदली व रोजंदारी कामगारांना आनंदाची बातमी ; राष्ट्रवादीचे चंदनशिवे यांचे प्रयत्न यशस्वी
सोलापूर महानगरपालिकेमधील 249 बदली व रोजंदारी कामगारांना महापालिका सेवेत कायम करण्याचा दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिकेतील बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडे दुरुस्ती प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने पाठवून दिल्याबाबत सर्व बदली व रोजंदारी कामगार यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त व उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये विस्तारीत चर्चा झाली.


दुरुस्ती प्रस्ताव पाठवल्या निमित्त आयुक्त व उपायुक्त यांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत. अशी माहिती चंदनशिवे यांनी दिली.
यावेळी गौतम नागटिळक, अमर सोनकांबळे बाळू शिंदे ,नितीन शिरसाट ,सिद्धार्थ दुपारगुडे, राजाराम लोखंडे, अजित वाघमोडे, नागनाथ आखाडे अनिल तोरणे, शाहीर कांबळे ,बीटी जाधव ,अनिल खराटे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.