सोलापूर : जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे तसतसे एकमेकांवर टीका टिपणी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळतं. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया गाडीच्या नेत्यांना ट्विटर द्वारे एक मेसेज केला होता.
त्यामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोंचू हा शब्द वापरला आहे त्यावर आता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमधून चांगलाच संताप व्यक्त होत असून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकरांच्या ट्विटला चांगलेच उत्तर दिले आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी पाठवलेले वीट काय होते आणि त्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काय उत्तर दिले वाचा खालील प्रमाणे….
प्रिय भारत आघाडी सदस्यांनो,
आमच्या वारंवार पत्रांनंतरही तुम्ही आमचा पक्ष – VBA INDIA आणि MVA दोन्हीमध्ये समाविष्ट करत असलात तरीही आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो. मोदी आणि त्यांच्या पक्षाने वेळोवेळी काही विरोधी नेत्यांची अपमानास्पद नावे घेऊन त्यांची खिल्ली उडवली आहे. काल मी मोदींना घोंचू म्हटले. आमचा प्रस्ताव आहे की तुम्ही हा शब्द घ्या आणि त्याला एकत्रितपणे घोंचू म्हणा !
प्रकाश जी,
तुम्ही तुमचे आडनाव या राष्ट्राने निर्माण केलेल्या महान विचारवंतांपैकी एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून घेतले आहे! निदान त्या आडनावासाठी तरी अशी भाषा वापरणे सोडून द्या! खरंच, तुम्ही MVA आणि INDI अलायन्सला त्यांच्या गोटात तुमच्या प्रवेशासाठी ‘आर्जव ‘ करीत आहात हे पाहून वाईट वाटते, तरीही भाजपला त्याचा काहीही फरक पडणार नाही…! या महान देशाच्या लाखो लोकांनी आधीच पंतप्रधान म्हणून मोदीजींना तिसर्यांदा विजय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे!
Dear INDIA alliance members,
Though you are still to induct our party — VBA in both INDIA and MVA despite our repeated letters, we would still like to help you.
Modi and his party have, time and again, mocked and ridiculed certain opposition leaders with derogatory names.… pic.twitter.com/MFY7SIEnzi
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 14, 2024
Prakash ji,
You borrow your surname from one of the greatest intellectual minds this nation has ever produced, Dr. Babasaheb Ambedkar! At least, desist from using such language for the sake of that surname!
Really, its saddening to see you begging to MVA and INDI Alliance for… https://t.co/qim2pOqCJa
— Sachin Kalyanshetti (Modi Ka Parivar) (@Kalyanshetti_S) January 15, 2024