ब्रेकिंग : सोलापूर लोकसभेसाठी भाजप कडून आ.राम सातपुते फायनल ; ; राम सातपुते थोडक्यात परिचय पहा
सोलापूर : सोलापूर भारतीय जनता पार्टी कडून सोलापूर लोकसभा राखी साठी उमेदवार कोण असा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात होता परंतु रविवारी भारतीय जनता पार्टीने सोलापूरच्या जागेसाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव फायनल केल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय जनता पार्टी कडून काही वेळातच या नावाचे अधिकृत यादी जाहीर होणार आहे.
काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर भाजपचा उमेदवार कोण? अशी चर्चा होती परंतु आता त्यांच्या तोडीला तोड, युवा, आक्रमक, अभ्यासू म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
सोलापुरात राम सातपुते यांच्यामुळे जय श्रीराम चा नारा जोरदार ऐकण्यास मिळेल. सिंहासनने भाजपला तारण्यासाठी राम येणार या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याप्रमाणेच भाजपने आता उमेदवारी घोषित केली आहे.
दरम्यान कोण आहेत राम सातपुते?
*42 – सोलापूर लोकसभा मतदारसंघ (अनुसूचित जाती राखीव – SC) भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांचा जीवन परिचय*
जीवन परिचय
नांव :- श्री. राम विठ्ठल सातपुते
जन्म :- 12 मार्च 1988
जन्म ठिकाण :- डोईठाण, तालुका आष्टी, जिल्हा बीङ, महाराष्ट्र
शिक्षण :- बी टेक पॅकेजिंग टेक्नोलॉजी)
ज्ञात भाषा :- मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती :- विवाहित, पत्नी सौ. संस्कृती राम सातपुते
व्यवसाय :- सामाजिक कार्य.
पक्ष :- भारतीय जनता पक्ष.
मतदार संघ :- 254- माळशिरस (अनुसूचित जाती), जिल्हा- सोलापूर
इतर माहिती :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री, भारतीय जनता पक्षाच्या युवामोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सन 2017 मध्ये सामाजिक कार्याबद्दल पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतर्फे मराठवाडा युवारत्न पुरस्कार व साहेब प्रतिष्ठान तर्फे संघर्ष योध्दा पुरस्काराने सन्मानित, ऑक्टोंबर 2019 मध्ये माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड, भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर कार्यरत..
परदेश प्रवास :- साऊथ कोरियाचा अभ्यास दौरा.
छंद :- वाचन व लेखन