गेल्या निवडणुकीत दुरावलेले मामा-भाचे पुन्हा एकत्र ; काका साठे यांचा सुभाष देशमुख यांना पाठिंबा
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पॅनल उभे केलेले आमदार सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांची वडाळा गावी जाऊन त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर मागील बाजार समितीच्या निवडणुकीत दुरावलेले मामा भाचे पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळते.
या भेटीनंतर माहिती देताना काका साठे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक मोठ्या नेत्यांना डावलण्यात आले त्याची खंत आम्हालाही आहे. सुभाष देशमुख यांनी उभा केलेल्या पॅनलला उत्तर सोलापूर तालुक्यातील आमच्या सर्व ग्रामपंचायत सोसायट्यांचे मतदार देशमुख यांच्या पॅनलच्या पाठीशी उभे राहणार आहेत असे सांगत देशमुख यांनी पॅनल करण्यापूर्वी आम्ही संपर्क केला परंतु त्यांच्याकडे प्रतिसाद न मिळाल्याची खंत ही साठे यांनी बोलून दाखवली.
काका साठे यांनी सुद्धा बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांना दोनही पॅनल कडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.