Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur | महापालिका निवडणूक | प्रभाग 10 व 11 च्या प्रारूप रचनेवर हरकत | Municipal Election | Objections to the draft structure of Wards 10 and 11

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 February 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर -: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या प्रभाग क्र. 10 आणि 11 च्या प्रारूप नकाशा व व्याप्तीबाबत हरकत घेतली असून प्रारूप प्रभाग क्र. 10 मधील अभौगोलिक भाग व परिसर, कमी करून तो कमी केलेला भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये समाविष्ट करावा, अशी लेखी हरकत छावाचे योगेश पवार यांनी राज्य निवडणूक आयुक्त, महापालिका आयुक्त आणि निवडणूक कार्यालय, सोलापूर यांचेकडे घेतली आहे.


याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना हि सदोष असून प्रारूप प्रभाग रचनेवर राजकीय पक्ष व चालू नगरसेवकांचा हस्तक्षेप झालेल्या असून प्रभाग क्र. 10 आणि 11 याची भौगोलिक परिस्थिती, हद्दीतून जाणारा रेल्वेमार्ग/लोहमार्ग आणि बोगदा, प्रभागातून जाणारे प्रमुख मोठे रस्ते आणि प्रभागातील लोकसंख्येचा विचार न करता प्रभाग क्र. 10 आणि  11 ची बेकायदेशीरपणे अभौगोलिक प्रभाग रचना केलेली आहे. तसेच प्रभाग क्र. 10 आणि 11 ची प्रारूप प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाने दि. 03 मे 2005 रोजी दिलेल्या आदेशाचे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे सरार्सपणे उल्लंघन केल्याचे हरकतीमध्ये म्हटले आहे.


प्रभाग क्र. 10 मध्ये समाविष्ट असणारा परिसर रेल्वेमार्ग/लोहमार्गामुळे दोन भागात विभागलेला असून 86 टक्के लोकसंख्येचा भाग व परिसर लोहमार्गाच्या पश्चिमेकडील आहे, तर फक्त 14 टक्के लोकसंख्येचा भाग व परिसर लोहमार्गाच्या पूर्वेकडील आहे. थोडक्यात, प्रारूप प्रभाग क्र. 10 हा लोहमार्गाच्या पश्चिमेकडे 86 टक्के, तर पूर्वेकडे 14 टक्के याप्रमाणे नैसर्गिक व भौगोलिक दृष्ट्या स्पष्ट व ठळकपणे विभागलेला आहे. त्यामुळे सदरची रचना बेकायदेशीर आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग क्र. 10 मधील लोहमार्गाच्या पूर्वेकडील भाग व परिसर, प्रभाग क्र. 10 मधून कमी करून सदरचा भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये समाविष्ट करून प्रभाग क्र. 10 व प्रभाग 11 ची नियमाप्रमाणे भौगोलिक दृष्टया सलग व Compact पध्दतीने नव्याने प्रभाग रचना करण्यात अशी मागणी योगेश पवार यांनी केलेली आहे.


तसेच प्रभाग क्र. 11 हा वार्ड लोकसंख्येच्या दृष्टीनेही बेकायदेशीर असल्याचे नमूद करून प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाच्या लोकसंख्ये बाबतच्या नियमांचे पालन केलेले नाही. कारण नियमाप्रमाणे प्रभाग क्र. 11 ची लोकसंख्या ही कमीत-कमी 22737 इतकी पाहिजे. असे असतांनाही प्रभाग क्र. 11 चा लोहमार्गा पर्यंतचा सलग भाग व परिसर तोडून तो भाग प्रभाग क्र. 10 मध्ये समाविष्ट केल्यामुळे प्रभाग क्र. 11 ची लोकसंख्या कमीत-कमी पेक्षाही कमी झालेली आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 10 चा लोहमार्गाच्या पूर्वेकडील जवळपास 3800 लोकसंख्या असणारा भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये जोडण्याची मागणी केली आहे.


प्रारूप प्रभाग क्र. 10 मधील लोहमार्गाच्या पूर्वेकडील भाग व परिसर, प्रभाग क्र. 10 मधून कमी करून सदरचा भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये समाविष्ट करून प्रभाग क्र. 10 आणि प्रभाग 11 ची नियमाप्रमाणे भौगोलिक दृष्टया सलग व Compact पध्दतीने रचना करण्याची मागणी हरकती अर्जामध्ये केली आहे. तसेच हरकती अर्जानुसार प्रभाग क्र. 10 आणि 11 च्या प्रभाग रचनेत बदल नाही केल्यास हायकोर्ट, मुंबई यांचेकडे दाद मागण्याचा इशारा योगेश पवार यांनी दिलेला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात रिपाइं नेत्यांच्या मुलावर गुन्हा दाखल ; रस्त्यावर वाढदिवस करणे पडले महागात | Son of Rpi leader charged in Solapur

Next Post

सोलापूर : सर,मला माफ करा.., रणजित गुरुजी ‘डिसले’ स्वतःच्याच जाळ्यात ‘फसले’ | Ranjit Disle Guruji fell into his own trap

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : सर,मला माफ करा.., रणजित गुरुजी 'डिसले' स्वतःच्याच जाळ्यात 'फसले' | Ranjit Disle Guruji fell into his own trap

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979133
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group