शिखर पहारीया यांच्या वागण्यात बोलण्यात सुशीलकुमारांची झलक ; सोलापुरात अनेकांना दिला मदतीचा हात
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू उद्योगपती शिखर पहारीया हे पुन्हा गुरुवारी सोलापुरात येऊन गेले. सोलापूरच्या या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, प्रश्न जाणून घेतले, त्यांना मदतीचा हात सुद्धा दिला आहे. शिखर यांच्या वागण्यात बोलण्यात सुशीलकुमार शिंदे यांची झलक दिसत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.



सर्व समाज घटकांना समावेश करून शिखर पहारिया यांचा दौरा झाला. या दौऱ्यात विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. सामाजिक संस्थाना मदत, औद्योगिक केंद्राना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.
सोलापूर शहरातील युनिफॉर्म प्रोडक्शन युनिटला भेट दिली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शाहजहुर अली दर्गा ला भेट देऊन चादर चढवली, तिथल्या समस्या समजून घेत सोडवण्याची ग्वाही दिली. अक्कलकोट रोड येथील वृद्धाश्रमास भेट देऊन तेथे मदत देण्यात आली व येणाऱ्या काळात त्यांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्याचा ग्वाही दिली.
एकूणच सोलापूर शहरातील बुद्ध विहार, शाहजहुर दर्गा, तसेच विविध शारदीय नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देऊन सर्व जाती-धर्माची सांगड घालताना आपल्या आजोबाप्रमाणे सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवले. या दौऱ्यामुळे काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.