Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

संविधान जागर यात्रेच्या प्रेसमध्ये नेते म्हणाले आम्ही भाजपचे नाही ; पत्रकारांच्या प्रश्नांवर उपस्थित झाले कावरे बावरे !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 August 2024
in political
0
संविधान जागर यात्रेच्या प्रेसमध्ये नेते म्हणाले आम्ही भाजपचे नाही ; पत्रकारांच्या प्रश्नांवर उपस्थित झाले कावरे बावरे !
0
SHARES
943
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संविधान जागर यात्रेच्या प्रेसमध्ये नेते म्हणाले आम्ही भाजपचे नाही ; पत्रकारांच्या प्रश्नांवर उपस्थित झाले कावरे बावरे !

सोलापूर :  विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन राज्यात संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने संविधान जागर यात्रा दिनांक 9 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 24 दरम्यान सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी अशी आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत संविधानाच्या हत्येचा प्रयत्न करणारी काँग्रेस अशाप्रकारे काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यात आले आहे. त्यावरून ही यात्रा भाजप समर्थक असल्याची दिसून आली.

दरम्यान या यात्रेतील काही प्रमुख सदस्य आज शनिवारी सोलापुरात असून न्यू बुधवार पेठेतील बॉबी चौक याठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची माहिती देण्यासाठी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संयोजक मंडळातील भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ऍड वाल्मीक निकाळजे बीड, जय भीम आर्मीचे नितीन मोरे, मुंबईच्या योजना ठोकळे, मुंबईच्या स्नेहा भालेराव, सोलापूरचे राजा माने, अजित गायकवाड, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची उपस्थिती होती.

पत्रकारांनी केंद्र सरकारने मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला आजपर्यंत किती निधी दिला?, या बजेट मध्ये कितीची तरतूद केली? सामाजिक न्याय विभागाचा कोट्यवधीचा निधी हा इतर योजनांकडे वळवला जात आहे तुम्ही काय करता मग? संविधान भाजप बदलणार असे भाजपचेच नेते वक्तव्य करतात तर तुमच्या तून विरोध का होत नाही? असे अनेक प्रश्न विचारले तेव्हा उपस्थित नेते कावरे बावरे झाल्याचे पाहायला मिळाले. व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. उपस्थितांमध्ये काहींनी तर आम्ही भाजपचे नाही असे म्हणून पत्रकारांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. एका नेत्याने तर उलट पत्रकारांना  पत्रकार हे विविध पक्षाच्या लेबलवर  काम करतात असे सांगून शेवटी चिमटा काढला.

Tags: Solapur BJPवाल्मीक निकाळजेसंविधान जागर यात्रा
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्याचे तापमान 2 अंश सेल्सिअस कमी करण्यासाठी प्रयत्न ;  परिवर्तन समूह संस्थेचा असा ही पुढाकार

Next Post

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा यशस्वी पाठपुरावा ; पंढरपूरच्या दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 110 कोटीच्या आराखड्याला मान्यता

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998184
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group