सोलापूर : खोटा बनावट खरेदी दस्त स्वतःचे फायद्यासाठी अस्तित्वात आणून त्याकरीता खोट्या व्यक्ती उभे करून कागदपत्रे तयार करून त्याआधारे नमुद मिळकतीवर स्वतःचे नाव लावण्याचा प्रयत्न करून फिर्यादी व शासनाची फसवणूक करून ती मिळकत लुबाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महम्मद सलीम अ.करीम कल्याणी यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अंबादास व्यंकटेश चव्हाण (वय-६२ वर्षे, रा- ४, म्युनसिपल कॉलनी रेल्वे लाईन, सोलापूर) यांच्या मालकीचा मौजे मजरेवाडी येथील अंत्रोळीकर नगर भाग-२ मधील प्लॉट नं ६४, यासी जुना सन २७१/१ व २७३/२ यासी नवीन सर्व्हे नं १७/२ या मिळकतीसंबंधी महम्मद सलीम अ.करीम कल्याणी यांच्याशी कोणताही व्यवहार केलेला नव्हता, असं अंबादास चव्हाण यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अंबादास चव्हाण यांनी कोणताही व्यवहार केलेला नसताना, १६ फेब्रुवारी २००० रोजीचे खरेदी दस्त नं ७३४ ही लिहून दिलेला नाही. वास्तविक खरेदी दस्त हा सलगरवाडी येथील खुल्या जागेचे संदर्भात असलेबाबत दुय्यम निंबधक कार्यालय येथील अभिलेखावर नोंद असताना देखील खरेदीखत लिहून देणार म्हणून असलेली व्यक्ती फिर्यादी नसताना सदर दस्तावर फिर्यादीची खोटी सही करून खरेदी घेणार म्हणून आरोपी व सह साक्षीदारांनी संगनमत करून फिर्यादीचे मालकीची शहर सोलापूर पैकी अंत्रोळीकर नगर भाग-२ मधील प्लॉट नं ६४, यासी जुना सन २७१/१ व २७३/२ यासी नवीन सर्व्हे नं १७/२ या मिळकतीसंबंधी खोटा दस्त बनवून फसवणूक केल्याची चव्हाण यांची फिर्याद आहे. त्यानुसार महम्मद सलीम अ.करीम कल्याणी (रा-१५० बेगम पेठ, सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक क्षीरसागर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.