MSP पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी कराल तर याद राखा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
कमी पैश्यात कापूस खरेदी करणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असणार आहे. हमीभावा पेक्षा कमी किंमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
शेतकऱ्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकारकडून कापूस खरेदीदारांवर चाप बसवण्यासाठी सरकारने ही पाऊलं उचलली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचे निर्देश दिले आहेत.
कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जर कोणी कमी किमतीत कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असेल तर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या कापसाला व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भाव मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो मोबदला मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत हे आदेश दिले आहेत.