Saturday, June 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘रे नगर’च्या 15 हजार घरकुलांचे होणार पंतप्रधानांच्या हस्ते वितरण ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 December 2023
in solapur
0
‘रे नगर’च्या 15 हजार घरकुलांचे होणार पंतप्रधानांच्या हस्ते वितरण ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा
0
SHARES
4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 14 (जिमाका):- प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रे नगर येथे 30 हजार घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याने येथील कामकाजाचा तसेच पायाभूत सोयी सुविधांचा आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, माजी आमदार नरसय्या आडम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, म्हाडाचे मिलिंद आटकळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. राठोड यांच्यासह संबंधित ठेकेदार अंकुर पेंदे आणि रे नगर हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रे नगर गृहप्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या एसटीपी व डब्‍ल्युटीपी प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या गृहप्रकल्पांतर्गत ठेकेदाराकडून ज्या पायाभूत सोयी सुविधा देण्यात येत आहेत. तेथील कामकाजाचा आढावा घेऊन ही सर्व कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रे नगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याने उर्वरित सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत. या प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना बँकांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेली सर्व गृह कर्जे त्वरित देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. जिल्हा आग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व संबंधित बँकर्सना याबाबत स्पष्टपणे निर्देश द्यावेत, असे श्री. राव यांनी सांगितले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून या ठिकाणी अंगणवाडी व शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषद व महापालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी. वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठ्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. प्रकल्प अंतर्गत सर्व रस्ते, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज बाबत कोणतीही तक्रार राहणार नाही याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने रे नगर येथे देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. तर अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे व उपजिल्हाधिकारी उदमले यांनी या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

Tags: Adam masterCEO Manisha AwhaleSaurabh Rao
SendShareTweetSend
Previous Post

दिलीपराव माने शिक्षण संकुलनात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

Next Post

सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षाना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची थेट ऑफर ; उमेश पाटील नक्की काय म्हणाले नक्की पहा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981996
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group