सोलापूर : जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे बैठकीत ठरले.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची 12 जानेवारी रोजी जयंती असल्याने जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद मधील सर्व जिजाऊ – सावित्री लेकींचा सन्मान करण्यात येणार आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याहस्ते व सर्व खातेप्रमुख यांच्या उपस्थितीत कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यांत येणार आहे. यामध्ये कर्तृत्वान महिला म्हणून
उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ( व) मिनाक्षी वाकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिता बांगर, कृषि अधिकारी दिपाली शेंडे, पत्रकार रेणूका वठारे,वरिष्ठ सहाय्यक प्रज्ञा कुलकर्णी, वरिष्ठ सहाय्यक ( लेखा) नम्रता मिठ्ठा ,
कनिष्ठ अभियंता मयुरी जावळकोटी, अंगणवाडी पर्यवेक्षिका वसुंधरा जिंदे, ग्रामसेविका सुरेखा सरवळे,
प्राथमिक शिक्षीका ओमदेवी घंटे, परिचर छाया क्षीरसागर
यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच रक्तदान शिबीर सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश गोडसे, अध्यक्ष , मराठा सेवा संघ शाखा जि प यांनी दिली. यावेळी सचिन चव्हाण, राम जगदाळे, आप्पा भोसले, विकास भांगे,चेतन भोसले, वासुदेव घाडगे,विशाल घोगरे, विट्ठल मलपे, सचिन पवार, संतोष शिंदे अभिजीत निचळ,भूषण काळे, प्रकाश शेंडगे, सर्जेराव गाडेकर, अविनाश भोसले, सुरेश पवार, आश्विनी सातपुते,सरस्वती पवार, अनिता भुसारे , अनुपमा पडवळे , सविता मिसाळ, प्रतिक्षा गोडसे ,उषा भोसले, सरस्वती पवार, उपस्थित होते.