रमेश कदम एमआयएम पक्षापेक्षा मोठे नाहीत ; जरनल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांचा संताप
एमआयएम सोलापूर लोकसभा निवडणुक लढवणार हे हैदराबाद येथील पक्षश्रेष्ठींना माहितीच नाही असा खुलासा एमआयएमचे जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांनी केला आहे. कोणाला ही विश्वासात न घेता एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला जाताच तर कसे, त्यांच्याकडे जायची गरजच नव्हती, पक्ष मोठा का व्यक्ती मोठा अशामुळे पक्षांची बदनामी होत आहे. कोणाला उमेदवारी हवी असेल तर दारूल सलाम एमआयएम पक्ष कार्यालयात येवून भेटावे, मग आम्ही पक्ष श्रेष्ठींना कळवू, उमेदवारी कोणाला द्यायची हे शेवटी तेच ठरवतील असे म्हणत एमआयएमचे जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.
सोलापूर लोकसभेची निवडणुक यंदा एमआयएम लढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच नुकतेच माजी आमदार रमेश कदम यांची एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती त्यामुळे जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे.
सोलापूर लोकसभा एमआयएम लढणार हे हैदराबादच्या पक्षश्रेष्ठींना माहितीच नाही सय्यद यांनी अन्वर सादात यांना फोनवर संपर्क केला असता त्यांना याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. शहराध्यक्ष शाब्दींना ही कदम यांच्या भेटीबद्दल माहित नसल्याचे फोनवरून सांगितले. त्या माजी आमदार यांना भेटण्यासाठी परस्पर का गेलात त्यांना विचारणा करा असेही पक्ष निरीक्षक सादात यांनी मला म्हटले होते. तीन उमेदवार कोण कोण इच्छूक आहेत तसा प्रस्ताव दाखवावा.
एमआयएम पक्षात सार काही अलबेल आहे. पक्षामधील वरिष्ठांना न विचारताच कोणतेही निर्णय घेतले जात आहे. माजी आमदार रमेश कदम हे एमआयएमकडून इच्छूक नसल्याचे त्यांनीच सांगितले आहे. एमआयएमचे काही पदाधिकारीच स्वताहून मागे लागले असल्याचे ते म्हणाले आहेत, याभेटीवरून वेगळाच निष्कर्ष बाहेर जातो, असे असताना स्वत:हून कदम यांना भेटण्याची गरजच काय होती. भेटायला गेल्यावर जनरल सेक्रेटरी, शहराध्यक्ष यांना विचारना ही केली नाही. रमेश कदम स्वता विचारायला ऑफिसला येणे गरजेचे आहे. एमआयएम पक्ष काय छोटा पक्ष नाही. अशामुळे एमआयएम पक्षाची बदनामी होत आहे. उमेदवार द्यायचा असेल तर सर्वाना विचारात घेवून देणे अपेक्षित होते. देशाचे संविधान बदलण्यापासून भाजपला रोखायचे असून हे विचार एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी यांचे विचार आहेत