“भाजपवाल्यांनों राम तुमचा नाही, राम आमचा आहे, तुमचा तर नथुराम” ; असिम सरोदे यांनी थेटच सांगितले
सोलापूर : आमची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात नाही तर मोदी -शहा या विकृती विरोधात आहे. लोकशाहीचे बाजारीकरण त्यांनी सुरू केले असून आता रामाला बाजारात आणून सोडले आहे.
आपला राम हा सीतेसोबत असतो, जोडीला लक्ष्मण, हनुमान असतात, त्यात पारदर्शकता आहे. त्यांनी रामाला बॉडी बिल्डर दाखवले आहे, रामाचा हे रूप आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. राम हा आपल्या सगळ्यांचा आहे. राम आमच्या श्वासात असून राम हा आमचा आहे, तुमचा नाही, तुमचा तर नथुराम असल्याचा हल्लाबोल एडवोकेट असीम सरोदे यांनी केला.
सोलापुरात निर्भय बनो सभा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काका साठे, शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे यांच्यासह हज़ारोंची उपस्थिती होती.