Saturday, September 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची लगबग वाढली ; जिल्हाधिकारी आशीर्वाद व आमदार कल्याणशेट्टी गेले सभेच्या स्पॉटवर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 January 2024
in political
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची लगबग वाढली ; जिल्हाधिकारी आशीर्वाद व आमदार कल्याणशेट्टी गेले सभेच्या स्पॉटवर
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 13(जिमाका):- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे नगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी नियोजित आहे. त्या अनुषंगाने रे नगर येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज केली.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, रेनगर गृह प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार किरण जमदाडे, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, ठेकेदार अंकुर पंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी उत्कर्ष होलकांसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घरकुल वितरण कार्यक्रम होत असलेल्या जागेची पाहणी केली. या ठिकाणी व्यासपीठ व व्यासपीठाच्या पाठीमागे आवश्यक कॅम्प ऑफिस, ग्रीन रूम ची माहिती घेतली. तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थी साठी एन्ट्री पॉईंट व एक्झिट पॉईंट ची माहिती तसेच येथे लाभार्थी आल्यानंतर त्यांच्यासाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी बाबत माहिती जाणून घेतली. पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी सभास्थळी उपस्थित राहण्यासाठी करण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या कामाची पाहणी तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेलिपॅड ची जागा योग्य आहे का याचीही त्यांनी माहिती घेतली.

रेनगर फेडरेशनच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता कळवली असल्याने त्या दृष्टीने सभा ठिकाणच्या परिसरात पंढरपूर येथून 400 शौचालये आणून ठेवली जाणार आहेत. तसेच कार्यक्रमाच्या वेळी व कार्यक्रम संपल्यानंतरही या परिसरात स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे येथील स्वच्छतेबाबत नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील तर त्यांच्या अधिनस्त सफाई कर्मचारी ही येथे नियुक्त करण्यात येतील असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील सभा स्थळाची पाहणी तसेच नागरिक येण्या जाण्याचे मार्ग, पार्किंग व्यवस्थाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सभास्थळ हेलीपॅड तसेच लाभार्थ्यांना ने – आण करण्यासाठी वापरण्यात येणारे रस्त्यांची पाहणी करून संबंधितांना करावयाच्या दुरुस्तीबाबत निर्देश दिले.

प्रारंभी प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी सभास्थळी करण्यात येत असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली तर ठेकेदार अंकुर पंदे यांनी पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिली.

Tags: @Solapur_visitAdam masterCollector kumar ashirwadMLA Sachin kalyanshettyPM narendra modi
SendShareTweetSend
Previous Post

अन् कावळ्याने सुटकेचा निःश्वास सोडला ; सोलापुरात अशी काय घडली घटना

Next Post

सोलापूरच्या आनंद चंदनशिवेंची उमेश पाटलांशी संगत वाढली  ; दोन दादा करणार का धमाका

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या आनंद चंदनशिवेंची उमेश पाटलांशी संगत वाढली  ; दोन दादा करणार का धमाका

सोलापूरच्या आनंद चंदनशिवेंची उमेश पाटलांशी संगत वाढली  ; दोन दादा करणार का धमाका

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998460
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group