सोलापुरात पोलिसाचा दणका ! राम सातपुते यांना शिवीगाळ करणाऱ्या मुस्लिम युवकाने मागितली माफी
लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर विजापूर वेस याठिकाणी फरदीस सलीम शेख व त्यांच्या काही साथीदारांनी जल्लोष मिरवणुकीत सहभागी होऊन घोषणा दिल्या. या घोषणेमध्ये त्यांनी भाजपचे राम सातपुते आणि पोलिस दलाला उद्देशून शिवीगाळ केली होती.
त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत चौकशी करून फरदीश सलीम शेख या युवकाला ताब्यात घेतले.
पोलिसानी केलेल्या खातरजमा नंतर शेख यांनी पोलिस व राम सातपुते यांची जाहीर माफी मागितली तो व्हिडिओ पोलिसांनी मीडियाद्वारे सर्वत्र प्रसारित केला आहे.