Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे नियोजन सुरू ; आडम मास्तर म्हणतात, 1 लाख लोकांना आणणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 January 2024
in Administration
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे नियोजन सुरू ; आडम मास्तर म्हणतात, 1 लाख लोकांना आणणार
0
SHARES
500
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 12(जिमाका):- देशाचे पंतप्रधान यांचा दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौरा नियोजित आहे. हा दौरा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी देण्यात आलेली असून ही जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित माननीय पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, रे नगर फेडरेशनचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावट, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, पंतप्रधान यांचा सोलापूर जिल्हा दौरा साठी खूप कमी कालावधी असल्याने सर्व संबंधित विभागानी दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे व अधिक प्रभावीपणे पार पाडावी. प्रत्येक शासकीय विभागात चांगला समन्वय राहील व दिलेली सर्व कामे गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी सुचित केले.

पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे म्हणाले, पंतप्रधान महोदय यांचा प्रोटोकॉल खूप मोठा असतो व त्यांच्या सुरक्षितेची विशेष काळजी घेतली जात असते. त्यामुळे प्रत्येक शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सुरक्षा पासेस शिवाय कार्यक्रम ठिकाणी व दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या ठिकाणी परवानगी मिळावी यासाठी सर्वांनी आपले पासेस त्वरित बनवून घ्यावेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने सर्वांनी चांगले सहकार्य ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजक रे नगरचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेनगर फेडरेशनच्या वतीने काही सूचना व मागण्या प्रशासनाकडे केल्या. पंतप्रधान महोदय यांचा दिनांक 19 जानेवारी रोजी च्या कार्यक्रमाची वेळ कळवावी तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी एक लाख लोकांना 500 ट्रक द्वारे आणण्याचे नियोजन असून त्यासाठी करावयाची कार्यवाही बाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून वेळेत माहिती मिळावी असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी पंतप्रधान दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने करावयाच्या कामाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कार्यक्रमाचे आयोजक रे नगर फेडरेशनने करावयाची कामे, पोलीस विभागाकडील सुरक्षा आराखडा व व्यासपीठावरील व्यवस्था, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, विमानतळ प्राधिकरण, बीएसएनएल, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद आरटीओ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय व राज्य माहिती विभाग तसेच अन्य सर्व जिल्हास्तरीय विभाग प्रमुख यांच्याकडील जबाबदारीची माहिती त्यांनी दिली. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी परस्परात समन्वय ठेवून कामे पार पाडावीत, असेही त्यांनी सुचित केले.

Tags: Adam masterCEO Manisha AwhaleCollector kumar ashirwadPM narendra modiRe nagar
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर बाजार समितीची दुसरी मुदतवाढ रद्द करा ; सोलापुरातील हा नेता गेला उच्च न्यायालयात

Next Post

सैराट फेम आर्चीला नाट्यदिंडीत सहभागी होण्यासाठी सांगणार ; धैर्यशील मोहिते पाटील यांची नाट्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयास भेट

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998259
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group