शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर
सोलापूर : साहेबांसारखा नेता नाही, शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार असे म्हणणारे काका आज मात्र शरद पवारांच्या विरोधात बोलू लागले आहेत. न सांगता जिल्हाध्यक्ष पद काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे व त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत त्यामुळे पक्ष सोडण्याची तयारी काका साठे यांनी मनोमन केली आहे.
अजित पवारांच्या पक्षात जाणार का असा प्रश्न विचारल्यावर आपलं आणि त्यांच जमत नाही
असे सांगून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा मनोमनी निर्धार केल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवारांनी जर पक्ष सोडू नको असे सांगितले तर काय करणार या प्रश्नावर काका साठे यांनी तातडीने “आता साहेबांच ही ऐकणार नाही, बस झालं साहेबांचं, पक्षात काय चालतं, सर्व सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या ताब्यात त्यांनी दिले आहे.
जेव्हापासून धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार झाले तेव्हापासून मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लुडबुड वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत मोहोळच्या राजू खरे यांचे एबी फॉर्म जाणीवपूर्वक मोहिते पाटलांनी स्वतःजवळ ठेवून घेतला होता. जर मोहिते पाटलांचाच ऐकायचं असेल तर आमचा पक्षात राहून काय फायदा अशी नाराजी साठे यांनी व्यक्त केली.

दरम्यान याप्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील मोहिते पाटील यांचे समर्थक मल्लिनाथ करपे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी काका साठे यांच्यावर टीका केली. काका साठे 25 ते 30 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते परंतु त्यांना अध्यक्ष करण्याची एकदाही डेरिंग कोणी केली नाही. पण 2010 ला अनेकांचा विरोध झुगारून विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले हे त्यांनी कधीही विसरू नये.