राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नदाफ, बगले, गायकवाड यांचा राष्ट्रवादी भवनात सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष पदी सलीम नदाफ यांची तर प्रदेश सरचिटणीस बसवराज बगले यांची नुकतीच निवड केली तसेच युवक प्रदेश सरचिटणीस पदी चेतन गायकवाड यांची निवड झाली. येणाऱ्या काळात अजितदादांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून दादा॔चे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत कराल अशी आशा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली.
नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. माजी आमदार रविकांत पाटील यांनी देखील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी भवन या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अनिल उकरंडे, किशोर पाटील, सुहास कदम, अमीर शेख, रुपेश भोसले, अनिल छत्रबंद, इरफान शेख, बसवराज कोळी, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, आलमेहराज आबादीराजे, मनोज शेरला, अशपाक कुरेशी, मुहिज मुल्ला, नागनाथ क्षीरसागर, सुरेश तोडकरी, श्याम गांगर्डे, धनंजय जाधव, आशिष म्हैत्रे, राजू फटफटवाले महिला पदाधिकारी महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, लता ढेरे यांची उपस्थिती होती.