आमदार विजयकुमार देशमुख सरसावले ! सोलापुरातील या महत्त्वाच्या विषयासाठी
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे परिसरात जड वाहतूक असल्याकारणाने काही ठिकाणी तडे जाऊन चिरा पडले आहेत. यावर लवकरात लवकर मजबुतीकरण करून सुशभीकरण करण्यात यावे अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेस केले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मजबुतीकरण करून तातडीने या कामाची सुरुवात करण्यात यावी. शहराचं केंद्रबिंदू असलेल्या या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे वर्दळ असते.या वर्दळी मुळेच येथील पुतळ्याच्या चबुतऱ्यास अनेक ठिकाणी तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. यावर पालिकेने लवकरात लवकर कारवाई करावी आणि संभाव्य दुर्घटना टाळावे अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना दिले.
यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी, राजकुमार पाटील, श्रीकांत घाडगे, बाबुराव जमादार, रमेश गायकवाड, सिद्धार्थ मंजेली, राजेंद्र मासम, रोहन सोमा, रुचिराताई मासम आदींची उपस्थिती होती.