आमदार सुभाष देशमुखांनी घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट ; राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिला हा सल्ला
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे सोलापूर दौऱ्यावर असताना आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर युनिफॉर्म गारमेंट मनुफॅक्चर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
राज्यपाल राधाकृषणन् यांनी खास सोलापूर मनुफॅक्चरर गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आवर्जुन बोलून घेतले व सोलापूर यूनिफॉर्म गारमेंट उद्योगाबाबत चर्चा करण्यात आले.
18, 19, 20 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झालेल्या बेंगलोर येथील युनिफॉर्म गारमेंट फेअरचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. उद्घाटनाला ते स्वतः आले होते. त्यामुळे त्यांना त्याची भव्यता आणि योग्यता लक्षात आलेली होती. म्हणून ते भारावून गेले होते.
या फेअरच्या कौतुका बरोबरच त्यांनी गारमेंट उद्योगाच्या विकासासंदर्भात देखील चर्चा केली. उद्योग वाढीसोबतच त्यातील बारकावे म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून उत्पादन कसे वाढवता येईल आणि त्याचे विक्री कसे करता येईल यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
देशातील पहिले युनिफॉर्म गारमेंट पार्क सोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभारण्या करिता स्वतः राज्यपाल यांनी मुख्यमंत्री सोबत बैठक लावतील असे आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
गारमेंट उद्योगाला लागणाऱ्या स्किल्ड लेबर, आणि मशिन रिपेअर करणारे लेबर तयार करण्याकरिता सोलापूर युनिव्हर्सिटी मध्ये सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन सोबत टाईप करून त्याचे नियोजन कसे करता येईल यावरही विचार झाला आणि तसे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
इतके चांगले युनिफॉर्मचे उत्पादन सोलापुरात असल्यामुळे युनिफॉर्म हब व्हावे व वेगवेगळ्या दर्जाचे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील युनिफॉर्म कसे बनवता येईल व त्याचे मार्केटिंग कसे करता येईल यावर खूप चांगली चर्चा झाली.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचेही गारमेंटशी निगडित अनुभव असल्यामुळे त्यांनी युनिफॉर्म मध्ये रुची दाखवली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख, सोलापूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रताप महानवर यांच्या सह असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा, अमित जैन, प्रकाश पवार, रमेश डाकलिया, वेंकटेश मेंगजी ,रोहन बंकापूरआदी उपस्थित होते.