आ. प्रणिती शिंदेंच्या सभांना मोहोळ तालुक्यात गर्दी ; मी भाजपच्या विरोधात बोलणारच
महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे कार्याध्यक्षा, आ. प्रणिती शिंदे ह्या मोहोळ तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी गावभेट दौरा सुरू असून रोजी तरटगाव, शिंगोली, पिरटाकळी, शिरापुर, विरवडे बु., दादपुर, परमेश्वर पिंपरी, कुरुल, शेजबाभुळगाव, कोथाळे, वडदेगाव, औढी, वरकुटे, टाकळी सिकंदर, पाटकुल, पेनुर या गावात भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या.
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, दहा वर्षातील सोलापूरचे दोन्ही खासदार अकार्यक्षम व निष्क्रिय राहिले असून मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मांडणारे कोणीही नाही राहिले त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे एकमेव आमदार म्हणून मी जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मोहोळसह जिल्ह्यातील तालुक्यांचा गाव भेट दौरा सुरू केला आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवेढा तालुक्याचा दौऱ्यामुळे शासनावर दबाव पडल्यामुळे आमच्या आक्रमकतेमुळे मंगळवेढा तालुक्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला २४ गावचा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली. मी ठेकेदार नसून माझ्याकडे फक्त कामच आहे. लोकांचे कामे करण्यासाठी राजकारणात आले नाही. गेल्या दहा वर्षात देशात राज्यात शहर जिल्ह्यात भाजपची सत्ता असून सत्ताधाऱ्यांनी एक तरी योजना आणली का ? सगळे सरकारी यंत्रणा खाजगीकरणाच्या माध्यमातून चालू आहे थोड्या दिवसात महाराष्ट्रच गुजरात ला चालवायला देतील असे वाटते महाराष्ट्रातील देशातील सर्व सरकारी कंपन्या, यंत्रणा ठेकेदारांना चालवायला देत आहे त्यामुळे नोकऱ्यात आरक्षणही संपवू लागले आहेत. तसेच आरक्षणासाठी अनेक आंदोलने होत असताना आरक्षण देत नाहीत. याविरुद्ध तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, युवावर्ग, दिव्यांग बांधव, व्यापारी बांधव, महिला भगिनी यांच्यासंबंधित न्याय मागण्या, त्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील अनेक महत्वपूर्ण विषयांवर जनतेचा शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ द्या असे आवाहन केले.
या गावभेट दौऱ्यात तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, सुभाष पाटील, राजेश पवार, शाहीन शेख, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, किशोर पवार, मयूर खरात, भीमराव वसेकर, रामभाऊ दुधाळ, आरिफ पठाण, अविनाश टेळे, अनिकेत पाटील, बळीराम जावळे, सुनील पवार, तिरुपती परकीपंडला, अशोक कांबळे, अन्ना बंडगर, लक्षण भालेराव, बाबुराव पाटील, ज्ञानेश्वर कदम पैलवान, संतोष गवळी, भागवत गुरव, डत्तात्री मुटकुळे, बळीराम पवार, चंद्रशेखर मोरे, महादेव सुरवसे, दयानंद अस्वले, भास्कर आठवले, धनाजी बचाटे, संतोष बचाते, संग्राम चव्हाण, भीमराव वसेकर, शंकर सातपुते, संतोष भोसले, दत्तात्रय सावंत, कुलदीप पवार, देविदास गायकवाड, निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.